Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपुरात रंगणार 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्ध

वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू
लोणंद येथे रन विथ बोल्ट द जिम फलकाचे अनावरण; 31 जुलै रोजी धावणार मॅरेथॉन
विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 40 वर्षांवरील टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सन 1990 च्या दशकात असणार्‍या इस्लामपूर शहरातील नामवंत संघ या क्रिकेट लीगमध्ये खेळातील. विजेत्या पहिल्या चार क्रमांक आकर्षक चषकाचे मानकरी असतील. तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत.
इस्लामपूर शहरात 90 च्या दशकात टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. तब्बल 60 हुन अधिक संघ शहरात होते. शहरातील विविध मैदानावर हजारोंच्या संख्येने मुले क्रिकेट खेळत होती. सध्या क्रिकेटच्या मैदानावर मुले खेळताना दिसतच नाहीत. मैदानी खेळाचे महत्व वाढवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
इस्लामपूर शहरातील उरण परिसरातील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर तीन ते सहा नोव्हेंबर दरम्यान स्पर्धा होतील. या स्पर्धेत दहा संघ साखळी पध्दतीने खेळतील. सहा षटकांचे सामने होतील. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, सर्वोत्कृष्ट झेल अशी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके दिले जाणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयदीप जाधव, मनोज पवार, संजय भोईटे, विनोद शिंदे, निवास पाटील, सुनील गुरव हे प्रयत्न करत आहेत.

सनी स्पोर्ट्स, एम. डी. पवार स्पोर्ट्स, पेप्सी स्पोर्ट्स, महाडिक स्पोर्ट्स, इंदिरा स्पोर्ट्स, जावडेकर स्पोर्ट्स, छत्रपती स्पोर्ट्स, शॉर्ट अँड टॉल स्पोर्ट्स, युनिटी व वाठारकर स्पोर्ट्स असे दहा संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील.6 नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. यावेळी शहरातील क्रिकेटचे राष्ट्रीय खेळाडू, आजी-माजी खेळाडू व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येणार आहे.

COMMENTS