पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत. यापैकी अनुसूचित जातीसाठी (एससी) आठ आणि अनुसूचित जमातीसाठी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण गटांपैकी १४ गट हे मागासवर्गीयांसाठी आरक्षित होणार आहेत. यापैकी अनुसूचित जातीसाठी (एससी) आठ आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) सहा जागा असणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आठपैकी चार जागा सर्वसाधारण व चार जागा महिलांसाठी तर, अनुसूचित जमातीच्या जागांपैकी तीन जागा सर्वसाधारण आणि तीन जागा या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत. मागासवर्गीयांसाठी कोणते १४ गट राखीव होणार, याचा फैसला येत्या १३ जुलैला होणार आहे. दरम्यान, आगामी खुल्या गटांच्या जागांमध्ये यंदा १३ ने वाढ होणार आहे
गटांची संख्या वाढल्याने आणि यंदाच्या गटांच्या आरक्षण सोडतीतून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) वगळण्यात आल्याने खुल्या गटांच्या जागांत वाढ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्यांची संख्या ही ७५ इतकी होती. त्यात सुधारणा केल्याने, आता आणखी सातने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता ८२ होणार आहे.
COMMENTS