आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व; वॉशिंग पावडर विकताय का ? राज ठाकरेंचा सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व; वॉशिंग पावडर विकताय का ? राज ठाकरेंचा सवाल

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘मुंबईम

देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा : महेश बनकर
’तोक्ते’ चक्रीवादळाचे दहा बळी ; घरे कोसळली ; बागा उन्मळल्या ; वीज खंडीत ; वाहतूक ठप्प
जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर शस्त्राने वार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ‘मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो.’ तसंच, ‘ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही लडाखमध्ये जेवताय? हे सगळे ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व पकपकपक बोलण्यासाठीच आहे. यांना दुसऱ्या गोष्टी नको आहेत.’, असे ते म्हणाले.

अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंवर टीका करण्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतं, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात.’ अयोध्या दौऱ्यावर ते पुढे म्हणाले की, ‘पण ज्या प्रकारचा माहौल अयोध्येत उभा केला जात होता…मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असते. तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. शेवटी मी म्हटलं आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसते. हा सगळा सापळा होता. आपण या सापळ्यात अडकायला नको. कारण या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून सुरू झाली.’, असे राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS