Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी फॅक्टरीला महाशिवरात्रोत्सवाचे आयोजन

देवळाली प्रवरा ः महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरीवरील शिंदे मळा येथील ओंकारेश्‍वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित

अहमदनगर जिल्ह्यात ११ जूलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी
के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन
अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न-बाळासाहेब थोरात

देवळाली प्रवरा ः महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून राहुरी फॅक्टरीवरील शिंदे मळा येथील ओंकारेश्‍वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवार 8 मार्च रोजी ओंकारेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने यावर्षीही महाशिवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ओंकारेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.                 महोत्सवाचे हे 17 वे वर्ष आहे. 8 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वाजता महादेवाला महारूद्राभिषेक घालण्यात येणार असून सकाळी 10 ते 12 वाजता डॉ.शुभम महाराज कांडेकर (श्रीक्षेत्र उंबरगाव) यांचे कीर्तन होणार आहे. यावेळी भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता अशोक महाराज बर्डे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहून कीर्तन आणि प्रवचन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन ओंकारेश्‍वर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.  

COMMENTS