Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड प्रतिनिधी - मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाला साजेशा विविध उपक्रमांचे आयोजन भव्य प्रमाणात हाती घेतले आहेत. याचा प्रातिनि

Nashik : नाशिक पेठ मार्गावर लाखो रूपयाचा बेकायदा गुटखा जप्त
अपघातात एकाच कुटुंबांतील 6 जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौर्‍यावर

नांदेड प्रतिनिधी – मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षाला साजेशा विविध उपक्रमांचे आयोजन भव्य प्रमाणात हाती घेतले आहेत. याचा प्रातिनिधीक शुभारंभ अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केला जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते येत्या 31 मार्च, 1 एप्रिल या कालावधीत हा शुभारंभ व बंदाघाट येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हाती घ्यावयाच्या विविध कार्यक्रमांची रुपरेषा निश्चित करण्यासाठी उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

COMMENTS