Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागातील तरुणीच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद

बीड प्रतिनिधी - बीडच्या कडा येथील ग्रामीण भागातल्या तरुणीच्या कलेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे. सेजल भंडारी असं या तरुणीचे नाव अस

लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की
अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उत्साहात मतदानास सुरवात 
सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले

बीड प्रतिनिधी – बीडच्या कडा येथील ग्रामीण भागातल्या तरुणीच्या कलेची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली आहे. सेजल भंडारी असं या तरुणीचे नाव असून तिने आठ तास 56 मिनिटात 8mm MDF बोर्डवर चार फुट व्यासाची सर्वात मोठी लीप्पन कलाकृती सादर केली आहे. ही कलाकृती बनवण्यासाठी क्ले मटेरियल आणि १६१७ वेगवेगळ्या आकाराचे काचेचे तुकडे वापरण्यात आले आहेत. आणि याचीच वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद झाली आहे. सेजल ही कडा येथील अनमोलक महाविद्यालयात शिक्षण घेते. नेहमीच आपल्या कलेतून ती विविध कला सादर करत असते. यावेळी तिच्या कलेची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने नोंद करून घेत या तरुणीने ग्रामीण भागातील तरुणांपुढे आदर्श उभा केला आहे.  

COMMENTS