Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

राहुरी प्रतिनिधी - जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राहुरीत  मोफत दंत तपासणी व निदान शिबिर तसेच दिव्यांगा साठी 75 टक्के रेल्वे पास सवलत शिबिराचे आयोजि

वीज पुरवठा बंद झाला तर…तातडीने फोन करा…
नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे
केंद्र सरकार महिला सन्मानाच्या विरोधी ः प्रा. राळेभात

राहुरी प्रतिनिधी – जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राहुरीत  मोफत दंत तपासणी व निदान शिबिर तसेच दिव्यांगा साठी 75 टक्के रेल्वे पास सवलत शिबिराचे आयोजित राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था या च्या वतीने शनिवार 10 डिसेंबर रोजी सकाळी 9ते 12 या वेळेत मिनी आयटीआय पाटील हॉस्पिटलसमोर कॉलेज रोड राहुरी या ठिकाणी आयोजित केले आहे तरी. राहुरी तालुक्यातील नागरिकांनी व दिव्यांगा याचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटने चे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.


सामाजिक करायची आवड असणारे राम डेंटल क्लिनिक चे संचालक डॉ. महेश इघे यांच्या वतीने गरीब व दिव्यांग बांधवासाठी गोरगरीब नागरिकांचे आपण काही देणे लागतो म्हणूनवरील उपक्रमा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दातांची तपासणी वेळेच्या वेळेला झाली नाही तर अनेक दातांच्या आजाराला सामोरे जावे लागते म्हणून प्रत्येक माणसाने वेळोवेळी दातांची तपासणी करून त्याचे निदान पाहिजे. तसेच ग्रामीण रुग्णालय राहुरी चे वैद्यकीय अधिकारी पाटील यांच्या सहकार्यने दिव्यांगासाठी रेल्वे पास मिळण्याची दिव्यांग प्रमाणपत्रच्या आधारे रेल्वे पास साठी लागणारे प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व कागद पत्र तीन प्रतिचा बंच करून रेल्वे प्रबंधक अहमदनगर येथे जमा केले जाईल तो पास साधारण एक महिन्यात आपल्याला मिळेल, परंतु आपल्याला जी पोच मिळेल त्यावर लगेच रेल्वे प्रवास करता येईल. प्रवासात 75 टक्के सवलत दिव्यांग दिव्यांगसोबत व्यक्तीला मिळणार आहे. ही सवलत 40 टक्के ते 100 टक्के दिव्यांग असणार्‍या व्यक्तीला मिळणार आहे. फक्त मूकबधिर कर्णबधिर व अंध व्यक्तीला 100 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. रेल्वेने पूर्ण भारतभर स्लीपर कोच ने प्रवासासाठी 75 टक्के सवलत तसेच सोबत जोडीदार यांना ही 75 टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र दिव्यांगऑनलाईन प्रमाणपत्र 40 टक्के पेक्षा अधिक, कर्णबधिर मूकबधिर, अंध यांना 100 टक्के ऑनलाईन दिव्यांग प्रणाम पत्र, आधारकार्ड (अपडेटेड), पासपोर्ट साईज फोटो 5 हे कागदपत्र आणणे आवश्यक आहे. या वेळी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सल्लगार सलीम भाई शेख, तालुका सचिव योगेश लबडे,सपंर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, महिला अध्यक्ष छाया ताई हारदे,उपाध्यक्ष रुपाली जाधव, तालुका समन्व्यक नानासाहेब शिंदे,तुकाराम बाचकर, भास्करराव दरदले, अनिल मोरे उपस्थिती होते.

COMMENTS