Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल सव्वा दोन लाखाचे डिझेलची चोरी

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या डिझेल पंपावरुन अज्ञात चोरट्याने 2 लाख 15 हजार  805 रुपये किमंती

क्रिकेटचे सामन्याने नाही तर विकासाच्या कामाने शुभारंभ ; माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड
गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे
पंतप्रधानांना भावली हिवरेबाजारची कोरोनामुक्ती गाथा

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या डिझेल पंपावरुन अज्ञात चोरट्याने 2 लाख 15 हजार  805 रुपये किमंतीचे 2 हजार 318 लिटर डिझेल चोरुन नेले आहे.राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या डिजेल पंपावरुन अज्ञात व्यक्तीने 16 मे रोजी सायंकाळी पासुन ते दि 17 मे रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान 2 लाख 15 हजार  805 रुपये किमंतीचे 2 हजार 318 लिटर डिझेल चोरुन नेले आहे.याबाबत संस्थेचे व्यवस्थापक सुभाष निवृत्ती कदम यांनी राहुरी पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. देवळाली प्रवरा वि.का. सेवा सह संस्थांच्या डिझेल पंपाच्या टाकीतून 2 लाख 15 हजार  805 रुपये किमतीचे 2 हजार 318 लिटर डिझेल  कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या समती शिवाय लबाडीचे इराद्याने स्वतःचे फायदाया करीता चोरून नेले आहे. देवळाली प्रवरा सोसायटीचा स्वतंञ वाँचमनची नेमणूक केलेली असताना डिझेल पंपावर चोरी कशी झाली.काही वर्षा पुर्वी देवळाली प्रवरा सोसायटीच्या वाँचमनला झाडाला बांधुन ठेवून संस्थेत चोरी झाली होती.संस्थेतील कपाटे बाहेर आणुन चोरट्यांनी फोडली होती.त्या घटने नंतर पुन्हा अज्ञात चोरट्यांनी डिझेल पंपाकडे आपला मोर्चा वळविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.साईनाथ टेमकर हे करीत आहे.

COMMENTS