Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उमेद अभियानाच्या वतीने खरेदी विक्री संमेलनाचे आयोजन

शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, हॉटेलमध्ये मिळणार बचत गटांना मिळणार स्टॉल्स

नाशिक : ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल ३०० प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्य

कोपरगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. थोरातांचा सत्कार
ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा
कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी

नाशिक : ग्रामीण भागातील महिला बचत समूहाकडून तब्बल ३०० प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती केली जाते. या उत्पादनांना सुयोग्य बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियान नाशिकच्या वतीने “खरेदी विक्री संमेलन २0२३”चे आयोजन हे जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात करण्यात आले होते. या संमेलनात नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट व उद्योजक उपस्थित होते.

बचत गटांकडून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तूंचा दर्जा व गुणवत्ता उत्तम असून त्यांना बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. खाद्यपदार्थामध्ये उद्योग करणाऱ्या उद्योग समूहांची संख्या शंभराच्या वर आहे तर विविध प्रकारची पापड उद्योग करणाऱ्या समूहांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील महिला कारीगर व कलाकसुरीच्या वस्तू उत्तम प्रकाराच्या गोधडी, पैठणीच्या वस्तू, पेंटिंग, प्रिमिक्स, चॉकलेट असे तब्बल ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची निर्मिती करीत आहे. या सर्व उत्पादनांना आपल्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण महिलांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

प्रस्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी उमेद अभियानंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली सर्व उत्पादने चांगली असून नेहमी गुणवत्ता व दर्जा राखूनच बाजारपेठेत विक्री केले जातात. त्यामुळे महिलांना एक संधी  आपल्या माध्यमातून मिळावी असे आवाहन उपस्थितांना केले. ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी महिला बचत समूहातील महिलांनी निर्मित केलेले उत्पादने अत्यंत चांगले असून कॉर्पोरेट इंडस्ट्रीजच्या उत्पादनांसारखेच आहेत. बाजारपेठेत विक्री करण्यासाठी सर्व उत्पादने अगदी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आहेत. त्यामुळे निमा असोसिएशन कडून आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत असे प्रतिपादन त्यांनी केले.

शासनाकडून अशा प्रकारचे उत्पादन विक्रीसाठी कार्पोरेट नियोजन केले हि कौतुकाची बाब आहे. ग्रामीण महिलांना याच माध्यमातून संधी निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे किराणा असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने मी सर्व किराणा होलसेलर यांना आवाहन करेल. तसेच माझ्या मॉलमध्ये “उमेद कॉर्नर” सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करून देईल असे आश्वासन प्रफुल संचेती यांनी यावेळी दिले. हॉटेल मध्ये जेवायला येणारा ग्राहक हा ग्रामीण भागातील हाताने तयार केलेल्या खाद्य पदार्थांना प्राधान्य देतो व त्यांना त्याची जास्त आवड असते. त्यामुळे याठिकाणी महिलांनी सर्वच खाद्य पदार्थ हे हाताने व उत्तम निर्मित केलेले आहेत. महिलांना त्यांचे उत्पादन विक्री करण्यास सहाय्य व्हावे यासाठी हॉटेल करीलीव्हज याठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ असे विक्रांत उगले यांनी सांगितले. तसेच हॉटेल ग्रेप कौन्टीचे किरण चव्हाण यांनी देखील महिला बचत समूहातील उत्पादनांना जागा उपलब्ध करून देऊ असे मत व्यक्त केले.

खाद्य प्रदर्थांना फूड प्रमाणपत्र नोंदणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्या पदार्थाचा दर्जा ग्राहकांना लक्षात येतो आणि त्या उत्पादनाप्रती ग्राहकांचा विश्वास वाढतो असेही मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी व्यक्त केले. 

प्रसंगी जिल्ह्यातील विविध बिगर शेती व शेती पूरक उत्पादने खरेदी करणारे खरेदीदार सर्व तालुक्यातील बचत समूहातील महिला विक्रिते जिल्हा व तालुका अभियान कक्षातील  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गहू ४० टन, मनुके २ टन, लसून १ क्विंटल, गहू, २ टन, तांदूळ १ टन, कांदा, ४० टन, तूर डाळ र्पोसेसिंग ४० टन, मका, २ टन, नागली व बाजरी २ टन, मकापापड, नागली पापड, प्रीमिक्स, शेभेच्या वस्तू, मेठ चंद्राची गोधडी, रागी कुकीज इत्यादी उत्पादनांना या खरेदी विक्री संमेलनात ऑर्डर मिळाल्या आहेत. प्रसंगी सूत्रसंचालन ज्योती केदारे तर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार जिल्हा व्यवस्थापक अमोल बाविस्कर यांनी मानले.

COMMENTS