Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : कविवर्य  कुसुमाग्रज  वि. वा. शिरवाडकर  यांच्या  जन्मदिनानिमित्त साजऱ्या  होणाऱ्या   मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स,

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
पोलिसांचा आणखी एक दणका…कर्जतच्या टोळीवरही मोक्का
इम्रान खानने विरोधकांना दाखवले अस्मान

पुणे : कविवर्य  कुसुमाग्रज  वि. वा. शिरवाडकर  यांच्या  जन्मदिनानिमित्त साजऱ्या  होणाऱ्या   मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, नॅशनल  बुक ट्रस्ट, भारत  सरकार व भारतीय विचार साधना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील  शिवाजीनगर येथील  महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे मराठी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने आजच्या दिवसाचे निमित्त साधून मराठी पुस्तक वाचनाचा संकल्प केला पाहिजे असे आवाहन यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी पुस्तक प्रदर्शनाच्या  उद्घाटन प्रसंगी केले. 

यावेळी  नॅशनल  बुक ट्रस्टचे पदाधिकारी  जितेंद्र  देवरूखकर यांनी  आपल्या मनोगतात  सांगितले कि नॅशनल  बुकात ट्रस्ट  ही  संस्था  जगभरातील  ५५ हून  अधिक भाषांमध्ये  पुस्तके प्रकशित करते , तसेच अनुवाद व नव लेखकांसासाठीच्या  प्रोत्साहन  योजना आणि  इतर  विविध पुस्तकविषयक  योजनांची  माहिती त्यांनी सविस्तरपणे  सांगितली.  नॅशनल  बुक ट्रस्ट  व भारतीय  विचार साधना फाउंडेशनच्या  पुस्तकांच्या  दोन्ही  गाड्या  या पुस्तक  प्रदर्शनात  सहभागी  झाल्या होत्या.             

अशा प्रकारच्या उपक्रमातून वाचनीयता वाढीस लागते,असे मत भारतीय  विचार साधना फाउंडेशनचे अध्यक्ष बिपीन  पाटसकर  व भारतीय विचार साधना फाउंडेशनचे संचालक अनिरुद्ध गोगटे यांनी व्यक्त केले.

यावेळी विचार यात्रा व्यवस्थापक पवन रेंगे,अमित दळवी, यशस्वी संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे आदी उपस्थित होते. अनेक  नागरिकांनी  या प्रदर्शनाला  भेट  देऊन  या उपक्रमाला सकारात्मक  प्रतिसाद  देत सातत्याने  असे उपक्रम  आयोजित  व्हायला  हवेत  अशी अपेक्षा  व्यक्त केली

COMMENTS