Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका रस्त्यावर पथदिवे लावण्याची त्रस्त नागरिकांची प्रशासनास मागणी

उरण - १२ जानेवारी २०२४ रोजी उरण रेल्वे स्टेशनचे उदघाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वात

विधान परिषद सदस्य नियुक्तीला 7 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती .
राहुरी तालुक्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभांची वाणवा  
विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून 8 लाखांचा दंड

उरण – १२ जानेवारी २०२४ रोजी उरण रेल्वे स्टेशनचे उदघाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांमध्ये  शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक , दिव्यांग यांचा मोठा सहभाग आहे.

       परंतू मध्ये उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाकापर्यंत  रोडवर पथदिवे नसल्याने संध्याकाळ नंतर पूर्णतः अंधार पसरला जातो. त्यामुळे शाळा- कॉलेज विध्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक या सर्वांना समोरून व पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे  आपला जीव मुठीत घेऊन, अंधारातून पायपीट करावी लागते. 

         तसेच मुख्यतः अंधारातून पायपीट करत असताना विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरीक यांच्या वर अंधाराचा फायदा घेऊन लुटमार, चोरी, छेडछाड असे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव  उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका मुख्यरोड वर  लवकरात लवकर ग्रुप-ग्राम पंचायत चाणजे व प्रशासन मार्फत पथदिवे बसविण्याची मागणी त्रस्त रेल्वे प्रवाशी करीत आहेत.

COMMENTS