Homeताज्या बातम्यादेश

संसद अधिवेशनात विरोधक आक्रमक

संविधानाची प्रत हातात घेवून आंदोलन

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. मात्र अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अधिवेशनापूर्वी संसद पर

चाकूचा धाक दाखवून वृध्द दाम्पत्यास लुटले
मुख्यमंत्री साहेब शेती परवडत नाही , वाईन विक्रीची परवानगी द्या| LOKNews24
पुणे शहरात प्लाझ्माचा तुटवडा निर्माण

नवी दिल्ली ः 18 व्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. मात्र अधिवेशनापूर्वीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. अधिवेशनापूर्वी संसद परिसरात विरोधकांनी आंदोलन सुरू केले. काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह काँगे्रस खासदार यांनी संविधानाच्या प्रती घातात घेत आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेवून संसदेत प्रवेश केला.
राहुल गांधी संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा संविधानावर हल्ला करत आहेत. राज्यघटनेवर हा हल्ला आम्ही होऊ देणार नाही. हा हल्ला आम्हाला मान्य नाही. दरम्यान, 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हातात संविधानाच्या प्रती घेऊन संसदेच्या बाहेर आणि लोकसभेच्या दालनाकडे घोषणाबाजी केल्या. त्यामुळे या अधिवेशनामध्ये विरोधक मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अधिवेशनात पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. मोदींनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील लोकसभा खासदारांनी शपथ घेतली. जेव्हा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव शपथेसाठी पुकारले गेले तेव्हा विरोधकांनी नीट-नेट परीक्षेवरून शेम-शेम असे म्हणण्यास सुरुवात केली. एनईईटी पेपर हेराफेरीप्रकरणी विरोधकांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आज सोमवारी काही खासदारांनी शपथ घेतली असून उर्वरित खासदार उद्या मंगळवारी शपथ घेणार आहे. तत्पूर्वी, भाजप खासदार भर्तुहरी महताब यांना सोमवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रपती भवनात उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या तीनही सदस्यांनी प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवर बहिष्कार टाकला. यामध्ये काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर. बालू यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. मात्र, तिघांनी देखील शपथ न घेतल्याने आताप्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे हे तीन सदस्य भुर्तहरी महताब यांना सहकार्य करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

भारताच्या अमृतकाळाचा शुभसंकेत ः पंतप्रधान मोदी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या लोकसभेचा कार्यकाळ सुरु होत असताना संसदेच्या अधिवेशनापूर्वी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली असल्याचे म्हटले. आजचा दिवस वैभवाचा आहे. स्वातंत्र्यानंतर आपण स्वत: बांधलेल्या नव्या संसदेत खासदारांचा शपथविधी सोहळा करत आहोत. आतापर्यंत ही प्रक्रिया जुन्या संसद भवनात होत होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  

सरकार बॅकफूटवर ः राहुल गांधी – काँगे्रस नेते राहुल गांधी एक्सवर पोस्ट करत एनडीए सरकारवर निशाणा साधला आहे. ’एनडीएचे पहिले 15 दिवस असे कॅप्शन राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, भीषण रेल्वे अपघात, काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले, ट्रेनमध्ये प्रवाशांची दुर्दशा, नीट घोटाळा, नीट-पीजी रद्द, युजीसी नेट पेपर लीक, दूध, डाळी, गॅस, टोल आणखी महाग, आगीने जळणारी जंगले, जलसंकट, उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे अनेकांचे मृत्यू यामुळे मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून आपले सरकार वाचवण्यात व्यस्त असल्याची टीका राहुल गांधी यांनी या पोस्टद्वारे केली आहे.

COMMENTS