Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसचे शाश्‍वत विचारच देशाला तारणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

समाजाला आर्थिक आणि मानसिक गुलामगिरीत अडकिवण्याचे मोदी सरकारचे धोरणमसूर / वार्ताहर : मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन सुटलेले आहे. महाग

खासदार उदयनराजे भोसले आज रायगडावर मोठा निर्णय घेणार असल्याचा इशारा
शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू; रांगणा किल्यावरील घटना; मृत तरुण पणूंब्रे-वारुण येथील
माण-खटावची इंच न इंच जमीन ओलीताखाली आणणार : आ. जयकुमार गोरे

समाजाला आर्थिक आणि मानसिक गुलामगिरीत अडकिवण्याचे मोदी सरकारचे धोरण
मसूर / वार्ताहर : मोदी सरकारचे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन सुटलेले आहे. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. समाजात असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले असून समाजाला आर्थिक अन मानसिक गुलामगिरीत अडकिवण्याचे काम सध्या मोदी सरकारचे सुरू असल्याचे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कोपर्डे हवेली मतदार संघातील जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या नडशी येथील 3 कोटी 65 लाख 25 हजार रुपये येवढ्या विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा तसेच कराड उत्तर मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक आणि युवक काँग्रेस विविध सेलचे पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा झाला.
यावेळी विविध कामाचे उद्घाटन व भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव थोरात होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व जि. प. सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील चिखलीकर, कराड उत्तरचे अध्यक्ष हेमंत जाधव, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार जगदाळे, सुदाम दीक्षित, राज्याचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व विभागातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि मोदी सरकारवर शाब्दिक तोफ डागली.
आ. चव्हाण म्हणाले, भाजप सरकार जाती-जातीत आणि धर्मा धर्मात तेढ निर्माण करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची ते ही दुसर्‍यांना पुढे करून असे कारनामे सध्या सुरू आहेत. परंतू काँग्रेस त्यास एक जुटीने जशास तसे उत्तर देईल. काँग्रेससह इतर पक्षातील अनेक चांगली लोक साम, दाम, दंड आणि भेद याचा वापर करून व दहशत निर्माण करून भाजपमध्ये सामील करून घेतली. मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा केली. परंतू महाराष्ट्रात आघाडीच्या माध्यमातून एकत्र येऊन त्यांचे मनसुबे उधळून लावले. या मतदारसंघातील लोकांनी सन 1991 च्या निवडणुकीत माझ्यावर विश्‍वास टाकला. मला थेट लोकसभेला निवडून दिले. थेट दिल्लीला पाठवले. तुमच्या सहकार्‍यामुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलो. परंतू सत्ता मिळाल्यानंतर काम कसे व काय करायचे हे मी दाखवून दिले. त्यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे साखळी बंधारे या प्रकल्पामुळे आज दुष्काळी भागाला मोठा फायदा झाला आहे. बंधार्‍यामुळे ठीक ठिकाणी पाण्याची साठवणूक होऊन बागायती क्षेत्र वाढल्याने समाधान वाटत आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्‍वत असून गांधी नेहरू, मौलाना आझाद, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी टिकवले. त्यांच्या विचारातूनच काँग्रेसचे कामकाज सुरू असून राज्यघटना स्थापन झाल्यापासून भारताने सर्वांना समानतेचा विचार दिला आहे. ही विचारधारा काँग्रेसच्या माध्यमातून टिकविण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.
यावेळी शिवराज मोरे, भानुदास माळी, डॉ. सुरेश जाधव तसेच अजित पाटील-चिखलीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक निवासराव थोरात यांनी केले आभार अमित जाधव यांनी मानले.

COMMENTS