Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुंबईच्या धरणांत केवळ ३२ टक्के पाणी

मुंबई प्रतिनिधी - मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त दोन महिने पूरेल एवढंच पाणीसाठी उपलब्ध आह

कोपरगावात ब्लॅक बेल्ट कराटे कॅम्प परीक्षा उत्साहात
व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला
मोबाईल टॉवरची बॅटरी चोरणारे मोठे रॅकेट उघडकीस; सात आरोपी अटकेत; तिघे फरार, शोध सूरू

मुंबई प्रतिनिधी – मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त दोन महिने पूरेल एवढंच पाणीसाठी उपलब्ध आहे. या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने खालावला असून तो 32.32 टक्क्यांपर्यंत खाली उतरलाय. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात कमी नीचांक असून मुंबईकरांवर पाणीबाणीचं संकट ओढवू शकतं. धरण परिसरात पाऊस होण्यापर्यंत म्हणजे पुढील चार महिने मुंबईकरांना पाणी साठा पुरवण्याच खडतर आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात 32 टक्के म्हणजे 4 लाख 67 हजार 766 दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी हे मुंबईकरांना तीन दिवस चालतं. पण उन्हाळा सुरु झाल्यानंतर मुंबई पालिकेचे नियोदजनाचे गणित फुसकटणार.

मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबई पालिकेने राज्य सरकारला राखील साठ्यातून पाणी मिळवण्यासाठी पत्र लिहिलं होतं. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हा पाणीसाठी 42 टक्के होता. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी हे मुंबईकरांना गरज पडल्यास वापरलं जाईल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

COMMENTS