कल्याण प्रतिनिधी- ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाइन द्वारे औषधे उपलब्ध करून देणाऱ्या मेडिकल स्टोअर्स मधून खरेदी केलेल्या औषधांचे पैसे ऑनलाई
कल्याण प्रतिनिधी- ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाइन द्वारे औषधे उपलब्ध करून देणाऱ्या मेडिकल स्टोअर्स मधून खरेदी केलेल्या औषधांचे पैसे ऑनलाईन मेसेज पाठवले, मात्र प्रत्यक्षात पैसे न पाठवता मेडिकल स्टोअर्स चालकाची फसवणूक केल्याप्रकरणी आयुष्यमान मिश्रा आणि रोशन गुप्ता या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्स मधून ऑनलाइन वरून आयुष्यमान मिश्रा आणि रोशन गुप्ता या दोघांनी 51 हजार 700 रुपयांची औषधांची खरेदी केली. या औषधांचे बिल आयुष्यमान मिश्रा यांच्या अकाउंट वरून मेडिकल स्टोअर्स च्या खात्यात वळते केल्याचा मेसेज रोशन गुप्ता याने आकाश प्रजापती यांना पाठवला मात्र प्रत्यक्षात प्रजापती यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने आपली आणि आपल्या सारखीच आपल्या इतर मेडिकल चालकांची या दोघांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रजापती यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दखल करत तपास सुरू केला आहे.
COMMENTS