Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारू पिताना झालेल्या वादातून एकाची हत्या

पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील घटना

पुणे/प्रतिनिधी ः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात कोयता गँगने निर

पुण्यात सिंहगड रोडवर फळविक्रेत्याची हत्या
माजी उपसरपंचाचा कुर्‍हाडीने घाव घालून हत्या
क्षुल्लक कारणावरुन आईकडून मुलीचा खून

पुणे/प्रतिनिधी ः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात कोयता गँगने निर्माण केलेली दहशत अजूनही कायम असून, काही दिवसांच्या अंतराने या कोयता गँगची दहशत पुन्हा पाहायला मिळत असतांना, पुण्यातील वाघोलीमध्ये दारू पितांना झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, दारू पीत असताना तीन कामगारांमध्ये वाद झाला. त्यातून शिवीगाळ व नंतर वाढलेल्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा निर्घृण खून करण्यात आला. पुणे-अहमदनगर रस्त्यावरील वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. शैलेश मांडगीकर (वय 26) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी दोन जणांवर लोणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय 25, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय -25, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगम चंद्रशेखर धारिया (वय- 23, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने या संदर्भात लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोटलापूरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर हे कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी त्यांच्यात शिवीगाळ झाली. मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळतच लोणीकंद पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील पुढील तपास करत आहेत.

COMMENTS