Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवाशातील जळीतग्रस्तांना एक लाखाची मदत

पंचगंगा उद्योग समुहाच्या वतीने मदतीचा हात

नेवासाफाटा : पंचगंगा शुगर अँन्ड पॉवर व पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने नेवासा येथील जळीतग्रस्त झालेल्या व्यावसायिकांना हातभार म्हणून सुमारे एक लाख

हंडेवाडीच्या युवकाची व्हॉटस अ‍ॅपद्वारे 4 लाखाची फसवणूक
युवकाला मारहाणीचा व्हिडीओ केला व्हायरल… गुन्हा दाखल
झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…

नेवासाफाटा : पंचगंगा शुगर अँन्ड पॉवर व पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने नेवासा येथील जळीतग्रस्त झालेल्या व्यावसायिकांना हातभार म्हणून सुमारे एक लाखाच्या मदतीचे वाटप करण्यात आले. पंचगंगा शुगर अँन्ड पॉवर पंचगंगा उद्योग समुहाचे प्रमुख युवा उद्योजक व संतसेवक प्रभाकरराव शिंदे यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निधी वाटप कार्यक्रम प्रसंगी सुमारे दहा व्यावसायिकांना त्यांच्या दुकानात जाऊन हा निधी देण्यात येऊन त्यांची विचारपूस करण्यात आली.
   यावेळी पंचगंगा सिड्स समूहाचे संचालक काकासाहेब शिंदे,विमा अधिकारी किशोर गारुळे,नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, आदिनाथ पटारे, अनिल निंबाळकर, महेश लबडे उपस्थित होते.यावेळी उपस्थित व्यापार्‍यांनी पंचगंगा उद्योग समूहाला धन्यवाद देत संकटकाळी आधार दिला म्हणून आभार मानले. संकट प्रसंगी मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा द्यावा म्हणून मदत देण्याची संकल्पना व प्रेरणा आम्हाला पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक प्रभाकरराव शिंदे यांच्याकडून मिळाली म्हणूनच आज खारीचा वाटा म्हणून सुमारे एक लाखाची मदतीचे वाटप करत आम्ही करत असून मनाला एक समाधान मिळत असल्याचे पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

COMMENTS