बीड : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, देशातील प्रत्येक व्यक्तीला 50 हजाराच्या वर रोकड जवळ बाळगता येत नाही. 50 हजाराच्या वर रोकड असेल
बीड : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, देशातील प्रत्येक व्यक्तीला 50 हजाराच्या वर रोकड जवळ बाळगता येत नाही. 50 हजाराच्या वर रोकड असेल तर, ही रक्कम कुठून आली, कशासाठी चालवली, याची स्पष्ट कारणे आणि पुरावे सादर करणे आवश्यक असतात, अन्यथा अशी रक्कम निवडणूक भरारी पथकाकडून जप्त करण्यात येतात. मात्र बीडमध्ये एका इनोव्हा कारमध्ये एक कोटी रूपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राज्यात सध्या तिसर्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळी सुरू असून, मतदान 7 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. असे असतांना बीडमध्ये एका कारमध्ये तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर शनिवारी रात्री ही रक्कम सापडली आहे. रोख रक्कम सापडलेल्या कारचालकाकडे कोणतेही कागदपत्रे नव्हती. तेसच रोख रकमे बाबत देखील समाधान कारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला असून एवढे मोठे पैसे कुठून आले? ते कुणाचे आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर देखील पोलिसांकडून तपासणी सुरू होती. शनिवारी रात्री एका संशयित कारला पोलिसांनी थांबवले. त्यात एका ट्रंकमध्ये पोलिसांना तब्बल एक कोटी रुपये सापडले. कार चालकाकडे या रकमेचे कोणतेही कागदपत्रे आणि पुरावे नव्हते. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कार क्रमांक एम एच 23 एचडी 0366 ही गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी सुरू आहे. सापडलेली रक्कम ही दहा लाख रुपयापेक्षा जास्त असल्याने कोषागार कार्यालयाला दिली जाणार आहे. आयकर विभागाचे अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून ही रक्कम काढली गेली होती का याची तपासणी करत आहेत. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
रोकड द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचा दावा – एका कारमधून ही रोकड नेली जात होती. वाहनाची तपासणी करत असताना कारमध्ये लोखंडी पेटी आढळून आली. पोलिसांनी कारचालकाकडे याबाबत विचारपूस केली.त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची असल्याचे सांगितले. संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीड येथील बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यावेळी या पैशासोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दहा लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम असल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहे.
COMMENTS