Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एकाची आत्महत्या

मुंबई : दादर स्थानकावर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृत

अजित पवारांच्या जीवाला धोका
मराठी पत्रकार संघाच्या मदतीने पोखरी तलाव परिसरातील शेती होणार गाळयुक्त
तीनच पर्याय !

मुंबई : दादर स्थानकावर उभ्या असलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात एका व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीग्राम एक्सप्रेसच्या स्वच्छतागृहात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतव्यक्तीने एक्सप्रेस मधील स्वच्छता गृहात मफलरच्या साह्याने गळफास घेतला होत. त्याचा मृतदेह काढून तो रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस तपासात हा मृत व्यक्ति मूळचा घाटकोपर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्यावर एक छेडछाडीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे तो फरार होता. या गुन्ह्यामुळे तो मानसिक तणावात होता अशी माहिती आहे. याच तणावातून त्याने आमहत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळा पासून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. दरम्यान, दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

COMMENTS