Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागतिक बानकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीन व्यंगचित्राचे प्रदर्शन संपन्न

बीड प्रतिनिधी - किमान समान कार्यक्रमा अंतर्गत आनंद एल यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश

मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार
कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास जाणून घेणे आवश्यक ः न्यायाधीश संजना जागुष्टे
आई-वडील ऊस तोडायला गेले, लेकरांचा पाण्यात बुडून झाला मृत्यू | LOKNews24

बीड प्रतिनिधी – किमान समान कार्यक्रमा अंतर्गत आनंद एल यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश बीड यांच्य मार्गदर्शनाखाली जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व आयुर्मगलम निवासी मुकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयाच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळील वरांडयामध्ये बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने व्यंगचित्रकार सुहास पालीमकर यांनी तयार केलेली व्यांगचित्र प्रर्दशित करुन जनजागृती करण्यात आली. उपस्थित असलेले पक्षकार आणि कर्मचारी यांनी त्य व्यंगचित्राचे अवलोकन व वाचन केले. बुडवू नका शाळा कामासाठी किंचित नका ठेऊ शिक्षणापासून बालकांना वंचित अशी अनेक बोधवाक्य प्रदर्शनातील व्यंग चित्रांवर लिहिलेली होती. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव आर. जी. बागडे, आयुर्मंगल निवासी मुकबधीर विद्यालयय बीडचे व्यंगचित्रकार तथा शिक्षक सुहास पालीमकर हे उपस्थित होते. हे प्रदर्शन सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 पर्यंत ठेवण्यात आले होते. दिवसभरात न्यायालया येणारे पक्षकार, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी अशा 300 ते 400 व्यक्तींनी प्रदर्शनास भेट दिली.

COMMENTS