इस्लापूर प्रतिनिधी - नांदेड येथे ब्लड सेंटरवर रक्त साठा कमी पडत असल्यामुळे गोरगरिबांना रक्त मिळत नाही. नागरिकांना आपला जीव गमावण्याची वेळ येऊ नये

इस्लापूर प्रतिनिधी – नांदेड येथे ब्लड सेंटरवर रक्त साठा कमी पडत असल्यामुळे गोरगरिबांना रक्त मिळत नाही. नागरिकांना आपला जीव गमावण्याची वेळ येऊ नये हे लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतरत्न संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या132व्या जयंतीनिमित्त आज14 एप्रिल रोजी कोल्हारी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबिराचे , उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी तालुका अध्यक्ष हौसाजी शेरे व तालुका सचिव संतोष शेरे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. गुरु गोविंदसिंगजी रक्तपेढी नांदेड येथील डॉक्टरांनी तपासणी करून ब्लड घेण्यास सुरुवात केली. एकूण 20 कार्यकर्त्यांनी रक्तदान देऊन मोलाचं सहकार्य केले आहे. या शिबिरास पत्रकार विलास भालेराव, विशाल भालेराव,राजेश गायकवाड ,दशरथ आंबेकर हे उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संजय कदम,जगदीश हनवते, विलास भालेराव, गौरव कदम, अक्षय शेरे यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडले आहे.
COMMENTS