Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा निवारा केंद्रात अन्नदान तसेच  जेष्ठ नागरिक व पत्रकारांचा सन्मान

शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांचा स्तुत्य उपक्रम...

बीड प्रतिनिधी - लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचा वैचारिक वारसा जोपासत जिव्हाळा निराधार केंद्र,बीड येथे काल सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज व मह

दिल्लीच्या पराभवाने आरसीबी प्लेऑफमध्ये ; कर्णधार रिषभ पंत ठरला खलनायक !
आघाडी सरकारच्या 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार : किरीट सोमय्यांचा इशारा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न

बीड प्रतिनिधी – लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचा वैचारिक वारसा जोपासत जिव्हाळा निराधार केंद्र,बीड येथे काल सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या संयुक्तं जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम तसेच जेष्ठ नागरिक व पत्रकार यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसंग्रामचे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे यांनी पत्रकार व जेष्ठ नागरिक रतीलालसिंह राजपूत साहेब,भरतसिंह बुंदेले सर यांचा सत्कार केला तसेच सौरभ तांबे यांनी शिवसंग्रामच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. जिव्हाळा निवारा केंद्रातील सदस्यांना अन्नदान करण्यात आले. ग्राउंड रिपोर्टिंग करणारे पत्रकार शेख रिजवान यांना नुकताच मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शेख रिजवान यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते देविसिहं शिंदे यांना युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे व शहराध्यक्ष ड.राहुल मस्के यांनी यावेळी लोकनेते विनायकराव मेटे साहेबांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.ते म्हणाले की,लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचे नेहमी कार्यकर्त्यांना सांगणे असायचे की, महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करत असताना ती सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी जेणेकरून गोरगरीब उंचीत उपेक्षितांना त्यातून लाभ मिळावा.समाजातील या घटकांना आधार मिळावा हा उदात्त हेतू समोर ठेवून कार्यकर्त्यांना ते नेहमी प्रोत्साहन देत असत .आज साहेब आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचा सामाजिक व वैचारिक वारसा शिवसंग्रामचे मावळे पार पाडताना दिसून येत आहेत .याचाच एक भाग म्हणून शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष शेषराव तांबे यांनी दोन्ही महापुरुषाची जयंती साजरी करत जिव्हाळा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांना भोजनाचा आस्वाद देत जयंती साजरी केली.याप्रसंगी शिवसांग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, शहराध्यक्ष ऍड. राहुल मस्के, सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय माने, युवकचे शहराध्यक्ष प्रशांत डोरले, कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे संचालक पंडित माने, युवा नेते मुकुंद गोरे, शहर सचिव गोपीनाथ देशपांडे, शिवसंग्राम नेते कैलास शेजाळ, अशोक लोकरे, हरिश्चंद्र ठोसर, अंकुश बुंदेले, जिव्हाळा केंद्रातील  सर्व सदस्य तसेच वार्डामधील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव शिवसंग्रामचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते .

COMMENTS