Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माउली दादांच्या पुण्यतिथी निमित्त कवडगाव ते चाकरवाडी पायी दिंडी सोहळा

वडवणी प्रतिनिधी - वडवणी तालुका येथील कवडगाव म्हणजे भक्ती ची आस लागलेलं गाव. यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित झालं आणि वारकर्‍यामध्ये आनंदा

महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होणार मतदान
मुंबईकरांची डबल डेकर बस होणार हायटेक
सुखवस्तू जीवनशैलीचा कर्मचारी वर्ग !

वडवणी प्रतिनिधी – वडवणी तालुका येथील कवडगाव म्हणजे भक्ती ची आस लागलेलं गाव. यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित झालं आणि वारकर्‍यामध्ये आनंदाचा वातावरण. वारकरी ही तशा तयारीत होतेच.अशातच ह भ प अशोक महाराज चोले यांची विशेष उपस्थिती असणार , म्हटल्यावर म्हातारा वयोवृद्ध माणूस पण दिंडी जायला तयारच होत असतो. एकविसाते शतकातले . महान संत व धाकटी पंढरी संबोधले जाणारे चाकरवाडी येथील माऊली बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ही दिंडी कवडगाव वरून बालाघाटच्या डोंगररांगा पार करून केज तालुक्यात मध्ये चाकरवाडी या ठिकाणी जात असते. तब्बल या पायी दिंडी सोहळ्यास 17 ते 18 वर्षे पूर्ण झाली असली त्याची माहिती अशोक महाराज चोले यांनी दिली आहे. आणि माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी या दिंडीचा खंड पडू देणार नाही असे देखील यावेळी छोले यांनी म्हटले आहे. दिंडीचा मुक्काम तीन ते चार दिवस असतो व योग्य ते सोय ही भक्तांची त्या त्या गावांमध्ये केली जाते अशी देखील महाराजांनी सांगितले. वडवणी तालुक्यात असणार्‍या पुंडलिकाच्या प्रकलपाच्या कडेवर असणार्‍या रुई गावात लगत भगवान नगर या ठिकाणी, लोकपत्रकार यांच्या घरी दिंडी नाष्टा करण्यासाठी थांबले असता त्या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागत करताना जयदेव भांगे, ज्ञानदेव भांगे, अशोक भांगे, अजीनाथ भांगे यांच्या सह अनेजणांनी सर्व भक्तांना फळे, व नाश्त्याची सोय करून पुढील दिंडी आता खडकी या ठिकाणी आज संध्याकाळचा मुक्काम करून पुढील नियोजनानुसार जाणार आहे.

COMMENTS