Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुरुपौर्णिमेनिमित्त भगवानगडावर सोमवारी गुरुपूजन सोहळा

भगवानगड प्रतिनिधी - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भव्य गुरुपूजन सोहळा साजर

 फुले-आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश बांगर व स्वागताध्यक्षपदी ड.सुरेश हात्ते यांची निवड
विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा
पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक

भगवानगड प्रतिनिधी – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भगवानगडावर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भव्य गुरुपूजन सोहळा साजरा होणार आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरलेल्या समाजात जनजागृती करून वै.गुरुवर्य श्री संत भगवानबाबांनी अज्ञानी समाजाला अध्यात्मासोबतच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अनेक धार्मिक ठिकाणच्या पशुहत्या कायमस्वरूपी बंद केल्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून सदाचार करण्याचे आवाहन बाबांनी समाजाला केले.
हा बहुमोलाचा संदेश बाबांनी समाजाला दिला. एकंदरीत बाबांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून आभार अभिव्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ’गुरुपौर्णिमा’ होय. या दिवशी गडाचा संपूर्ण भक्तवर्ग भगवानगडावर येऊन आपल्या श्रीगुरुंचे आभार अभिव्यक्त करतो. ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबांना आपले श्रीगुरु मानणार्‍या सर्वांनी सोमवारी भगवानगडावर येऊन आपल्या श्रीगुरु विषयीचा आदरभाव अभिव्यक्त करावा.  गुरुपूजन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता सुरु होणार आहे.

COMMENTS