Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बार्टीतर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

तुलसी इंग्लीश स्कुलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी

बीड- महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्त दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान राज्यभरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्र

स्वस्तात खरेदी करा नोकियाचा ‘हा’ नवा फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पाळणाघर योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घेणार ः मंत्री तटकरे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार

बीड- महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंती निमित्त दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 दरम्यान राज्यभरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे तर्फे समता पर्व  राबवले जात आहे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक पातळीवर देशाला एक राष्ट्र म्हणून स्थान प्राप्त करुन देले. त्यांच्या उत्तुंग कार्याचा विचार समाजापर्यंत पोहचविण्याकरिता समतादूतामार्फत सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुमंत भांगे, बार्टीचे महासंचालक  सुनिल वारे, निबंधक अस्वार मॅडम, बार्टीचे विभाग प्रमुख  सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
याचाच भाग म्हणून आज बीड येथील नामांकित तुलसी इंग्लीश स्कुल मध्ये वक्तृत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक हार्मिका जगतकर,क्षितीज धन्वे, द्वितीय क्रमांक अश्लेषा मुंडे तर तृतिय क्रमांक आर्या चव्हाण व प्राथमिक गटातून प्रज्ञा भालेराव, द्वितीय क्रमांक प्रतिक कांबळे, तर तृतिय क्रमांक प्रतापसिहं चव्हाण यांनी यश संपादन केले.
सदर स्पर्धेचे उदघाटन महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या उमा जगतकर, तर प्रमुख अतिथी म्हणून बार्टीचे प्रकल्प अधिकरी ज्ञानोबा मात्रे, समतादूत नानाभाऊ गव्हाणे, आखेब सय्यद, भिमा कानधरे हे होते. सदर कार्यक्रमाचे संचलन शिक्षिका मोहिनी मसुरे तर आभार रौफ पटेल सर यांनी मानले.

COMMENTS