कर्जत : अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी पार पडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे ओंकार गुंड यांची र

कर्जत : अहमदनगर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या निवडी पार पडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे ओंकार गुंड यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी उपस्थित होते.
निवडीनंतर ओंकार गुंड म्हणाले, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पुन्हा जी जबाबदारी दिली आहे ती मी सार्थ ठरवेल. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. गुंड यांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करत अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्ष पद भूषविले असल्याने त्यांना जिल्ह्यातील कामाचा अनुभव लक्षात घेवून त्यांची निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
COMMENTS