Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहुजी शक्ती सेनेच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी सोनिया ताई चांदणे तर  रुद्राक्ष चांदणे यांची विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड

बीड प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये मातंग समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी नामांकित असलेली लहुजी शक्ती सेना या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर

राष्ट्रवादी आणि ब्राम्हण महासंघ आमने सामने | LOK News 24
सिद्धटेक ग्रामपंचायतीत सत्तांतर
आ. थोरातांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची घेतली भेट

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये मातंग समाजासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी नामांकित असलेली लहुजी शक्ती सेना या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची आवक चालू आहे. नुकताच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष असलेले कैलास  खंदारे यांचा बीड जिल्हा दौरा पार पडला यामध्ये सुद्धा आंबेजोगाई व केज मधून मोठ्या प्रमाणावर युवकांनी प्रवेश केला होता. लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व प्रदेशाचे अध्यक्ष कैलास खंदारे आणि  प्रदेश उपाध्यक्ष भागवत वाघमारे यांच्या नेतृत्वामध्ये आणि  लहुजी शक्ती सेनेमध्ये नवनियुक्त मराठवाड्याच्या महिला उपाध्यक्ष जया लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये बीड शहरातील सोनिया ताई चांदणे यांचा जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी या पदी निवड करण्यात आलेली आहे. तर लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी रुद्राक्ष चांदणे यांची निवड करण्यात आलेली आहे तरी सर्वच तरातून यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. सध्याच्या काळात लहुजी शक्ती सेनेवर विश्वास ठेवून मातंग समाजातील अनेक युवक आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर संघटनेमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहेत.

COMMENTS