Homeताज्या बातम्यादेश

लवकरच ऑफलाईन कोचिंग सेंटर्स बंद होतील

‘सुपर 30’ चे संस्थापक आनंद कुमार यांचा दावा

नवी दिल्ली / प्रतिनिधी : दिल्लीतील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा

ओबीसींना न्याय नाकारणारे आरक्षण मागताहेत ! 
अज्ञाताने मायलेकींची धारदार शस्त्राने केली हत्या l LOKNews24
नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार : आदित्य ठाकरे

नवी दिल्ली / प्रतिनिधी : दिल्लीतील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेनंतर या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. कोचिंग सेंटरच्या मालकालाही अटक झाली होती. या घटनेवर दिल्ली महानगरपालिकेने बेकायदा बेसमेंटमध्ये असलेल्या कोचिंग सेंटरवर कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे येत्या 10 ते 15 वर्षात 90 टक्के ऑफलाईन कोचिंग सेंटर्स बंद होतील, असा मोठा दावा आनंद कुमार यांनी केला आहे.

येत्या 10 ते 15 वर्षांत 90 टक्के ऑफलाइन कोचिंग सेंटर्स बंद होतील. कारण आतापर्यंत ऑनलाईन अभ्यासात केलेल्या प्रयोगांची संख्या फक्त एक टक्का आहे. ऑनलाईन क्लासचे 99 टक्के काम बाकी आहे. शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग विकसित केल्यास विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्गांची गरज भासणार नाही. तसेच शिक्षकांची एक समर्पित टीम ऑनलाईन क्लासेस विकसित करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेसची गरज भासणार नाही. मी सरकारला एक संघ तयार करण्याचे आवाहन करतो. तसेच ऑनलाईन मोडमध्ये युपीएससी कोचिंग सुरू करावे. आजकाल बहुतेक लोकांनी कोचिंग सेंटर्समध्ये मार्केटिंग टीम आहेत. त्यामुळे विद्यार्थी एक प्रकारे ग्राहक बनले आहेत.

दिल्लीतील राजेंद्र नगरमधील एका आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पावसाचे पाणी शिरल्यामुळे यूपीएससीची तयारी करणार्‍या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या कोचिंग सेंटरवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे. कोचिंग इन्स्टिट्यूटने जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान भरपाई द्यायला हवी. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कोचिंग सेंटर्सनी मिळून मृतांच्या कुटुंबियांना भरपाई द्यायला हवी.

COMMENTS