राधेश्याम मोपलवावर हे नाव काही काळानंतर भारतीय प्रशासन सेवेतील एक कलंक म्हणून ओळखले जाईल, इतका बदफैली माज या अधिकाऱ्याला आल्याचे, त्यांच्या जीवनश
राधेश्याम मोपलवावर हे नाव काही काळानंतर भारतीय प्रशासन सेवेतील एक कलंक म्हणून ओळखले जाईल, इतका बदफैली माज या अधिकाऱ्याला आल्याचे, त्यांच्या जीवनशैलीत ही दिसते. १९८० ते २०१० या तीस वर्षाच्या काळात शासकीय नोकरीत असूनही तीन स्त्रीयांशी या अधिकाऱ्याने विवाह केला, जे एक प्रकारे बेकायदेशीर आणि भारतीय संस्कृती च्या विपरित होते. परंतु, खरी मेख अशी आहे की, भ्रष्टाचारातून कमावलेल्या अमर्याद संपत्तीची विल्हेवाट लावता यावी यातूनच या अधिकाऱ्याने हे अचाट साहस केले. पुष्पा, मनिषा आणि प्रियांका या तीन पत्नी. यातील दुसऱ्या मनिषा आणि प्रियांका यांच्या नावे संपत्तीची यादी बघून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. कागदोपत्री घटस्फोट दिलेल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे सहा कोटी रोख रक्कम, वरळी येथील एका भव्य टाॅवरमध्ये २० कोटी किंमतीचा फ्लॅट, नांदेड येथील पाच एकर चा भूखंड आणि तमसा काॅटन मिल, पुणे येथील तळेगाव एमआयडीसीत पाच एकरचा भूखंड आणि औरंगाबाद येथे पाच एकरचा भूखंड, नागपूर येथे शेती आणि पनवेल येथे ९ आणि ६ एकराचे दोन भूखंड, दहा कोटींचे दागिने, नांदेड ची नंदी काॅलेज, बॅंक स्टेटमेंट च्या आधारे त्यावेळी ३२ कोटीचे चेक आणि रोख रक्कम जमा आदी तपशील त्याकाळीच बाहेर आला होता. त्यांच्या तिसऱ्या पत्नीच्या मालमत्तेचा उल्लेख आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात केला होता. प्रियंका आणि मोपलवार यांनी २०१० मध्ये विवाह केला. तत्पूर्वी त्यांचा दुसरा विवाह मोडलेला नव्हता. दुसऱ्या पत्नीशी त्यांचा घटस्फोट २०१४ मध्ये झालेला. प्रियंका यांच्या एका कंपनी मार्फत मोपलवार यांचा पैसा हवाला मार्गे विदेशात पाठवला जाऊन गुंतवला जाऊ लागला. यात मैत्रेयी मोपलवार ही त्यांची दुसरी मुलगी आणि प्रियंका यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात काही तक्रारी अमेरिकेतही नोंदवल्या गेल्या. प्रियंका मोपलवार यांच्या कंपनीचा ड्रग्स व्यवसायाशी संबंध असल्याच्या संशयावरून नार्कोटीस विभागाच्या चौकशीच्या बडग्याखाली त्यांना वावरावे लागले होते.
राधेश्याम मोपलवावर यांच्या मुलीची कंपनी मेलोरा इन्फ्रास्ट्रक्चर हुजूर मल्टी प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीचे ४ लाख ९९ हजार ७९७ शेअर्स तर तन्वी मोपलवार या त्यांच्या मुलीच्या नावे ३ लाख ९९ हजार ५७१ एवढे शेअर्स आहेत. त्यांची दुसरी मुलगी जी अमेरिकेत राहते तिच्या नावे तीनशे कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता अमेरिकेत आहे. सदानंद मोपलवार हे त्यांचे बंधू मैत्रेयी च्या व्यवसायात अन्य दोघांसह मदत करतात. याच सदानंद मोपलवार यांच्या नावे वाकण-खोपोली येथे मोठी जमीन आहे.
राधेश्याम मोपलवावर यांच्या अमर्याद मालमत्तेला जिरवण्याचा एक भाग असावा की, १४ डिसेंबर २०१५ रोजी मोपलवार यांची कन्या तन्वी आणि त्यांची दुसरी पत्नी मनिषा यांनी तसेच पत्र १४ ऑक्टोबर २०१७ रोजी पंतप्रधान कार्यालयाला ऍफिडेव्हीट करून दिले. ज्यात त्यांना मिळालेली संपत्ती हा पोटगीचा भाग आहे, म्हणून नमूद केले होते. राधेश्याम मोपलवावर या अधिकाऱ्याने जमवलेली माया राजकीय नेत्यांनाही लाजविणारी आहे. त्यामुळे, नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत मोपलवार हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छित होते. परंतु, त्यांच्या ‘माया’जालाच्या भीतीने कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांना तिकीट देण्याचं साहस दाखवलं नाही. शिवाय, ब्लॅकमेल करणाऱ्या एका जोडप्याला या अधिकाऱ्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी नाशिक येथील दोन बेडरूम चा फ्लॅट बक्षीस दिला होता. वैचारिक दृष्टिकोन असलेल्या महाराष्ट्रात या अशा सत्त्वहिन अधिकाऱ्याने अधिकार गाजवावा, ही एक प्रकारे महाराष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी!
COMMENTS