मराठा आरक्षण आंदोलन रेंगाळत असताना काल अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मराठा आंदोलन ओबीसी समाजातून आरक्षण मा

मराठा आरक्षण आंदोलन रेंगाळत असताना काल अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. मराठा आंदोलन ओबीसी समाजातून आरक्षण मागण्यांसाठी ठाम असल्याने ओबीसी समुदाय आता अधिक सक्रिय झाला आहे. आरक्षण मराठा समाजाने स्वतंत्रपणे मागावे त्यात ओबीसींना स्वारस्य नाही. परंतु, ओबीसी आरक्षणातून त्यांना काहीच मिळणार नाही, हे मात्र ठामपणे आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवान हालचाली सुरु आहेत. काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली होती. यानंतर मराठा उपसमिती पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी दुसर्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी तामिळनाडू प्रमाणे का आरक्षण दिले नाही, ही फक्त वेळ काढायचे म्हणजे धकविण्याचे आहे. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात असून ते सर्वोच्च न्यायालयात टिकणारे नाही. सुनावणीला आल्यावर हेही समोर येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जात मागास ठरवण्याचे अधिकार घटनेने केवळ मागासवर्गीय आयोगाला दिलेले आहेत, ते शिंदे समिती ठरवू शकत नाही. गावच्या सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी हे सर्व सुरू असून पूर्वी दिलेल्या एसईबीसीमध्ये राजकीय आरक्षण नसल्यानेच आता राजकीय आरक्षणासाठी ही धडपड सुरू आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, आझाद मैदानातून बाहेर पडताना आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. तसेच, शरद पवारांनी आत्तापर्यंत आरक्षण का दिलं नाही, असा सवालही आंदोलकांनी विचारला. आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. तसेच, सुप्रिया सुळे या आंदोलन स्थळावरून, आझाद मैदानातून बाहेर पडताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घालत आक्रमपणे घोषणा देत आत्तापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी याकडे आधी लक्ष द्यावं आणि निर्णय घ्यावा. तुम्ही आमचे पक्ष फोडले, आमची घरं फोडली आणि सत्ता स्थापन केली ना, मुख्यमंत्री बनले ना? मग आता सत्तेत आहात. सरकार तुमचं आहे आणि निर्णयही तुम्हाला घ्यायचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावरून वाढत्या हालचालींचा ओघ पाहता, मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची आज १ सप्टेंबर रोजी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षणाचे संभाव्य परिणाम आणि मराठा आरक्षणावर ओबीसी समाजाची भूमिका याबाबत या बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

COMMENTS