Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

रत्नागिरी ः बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीमध्ये आणखी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरात राहणार्‍या न

राष्ट्रीय महामार्गावरील गिट्टीच्या ढिगार्‍यामुळे अपघातात वाढ
श्री करीबसवेश्वर यात्रेत कुस्ती स्पर्धा उत्साहात
दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी ‘महाशरद’ उपक्रम

रत्नागिरी ः बदलापूर येथील घटना ताजी असताना रत्नागिरीमध्ये आणखी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरात राहणार्‍या नर्सिंगच्या विद्यार्थिंनीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच पोलिस निरीक्षकांना देखील घेराव घालण्यात आला. आरोपीला पकडा आणि त्याला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली. लाखो रुपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र ते बंद आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासन तोंडघशी पडले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

COMMENTS