आता विश्‍वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्‍वरी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता विश्‍वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्‍वरी.

नगरच्या सुलभा भालसिंग यांनी 95 दिवसात केले लिखाण

स्वतःच्या हाताने वहीवर लिहिलेल्या ज्ञानेश्‍वरी ग्रंथासमवेत लेखिका सौ. सुलभा भालसिंग व सुरेशराव भालसिंग अहमदनगर प्रतिनिधी-  आता विश्‍वात्मके देेवे

कृषी कायद्यावर स्थगिती असतांना आंदोलन कशासाठी ? : सर्वोच्च न्यायालय | DAINIK LOKMNTHAN
कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाळवणीतील महत्वाचे रस्ते बंद
एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |
स्वतःच्या हाताने वहीवर लिहिलेल्या ज्ञानेश्‍वरी ग्रंथासमवेत लेखिका सौ. सुलभा भालसिंग व सुरेशराव भालसिंग

अहमदनगर प्रतिनिधी-  आता विश्‍वात्मके देेवे…म्हणत नगरमधील गृहिणी सौ. सुलभा सुरेशराव भालसिंग(Mrs. Sulabha SureshRao Bhal Singh) यांनी स्वतःच्या हाताने ज्ञानेश्‍वरी लिहिली आहे. कुटुंबाची आध्यात्मिक परंपरा, लहानपणापासून ज्ञानेश्‍वरीची केलेली पारायणे व हातून काहीतरी अलौकिक आध्यात्मिक कार्य घडावे, या हेतूने ज्ञानेश्‍वरी लिखाणाचे अवघड ध्येय त्यांनी साध्य केले आहे. एकटाकी लिखाणासारख्या सुंदरहस्ताक्षरातील ज्ञानेश्‍वरी त्यांनी रोज किमान 5 ते 6 तास बैठक करून 95 दिवसात पूर्ण केली आहे. नेवाशातील पैस खांबाजवळ बसून अखेरचे पसायदान त्यांनी लिहिले व स्वहस्ते ज्ञानेश्‍वरी लिखाणाचा संकल्प पूर्ण केल्याचा आनंद व समाधान त्यांनी अनुभवले. आता विश्‍वात्मके देवे…येणे वाग्यज्ञे तोषावे…तोषोनि मजद्यावे…पसायदान हे…अशी प्रार्थना करणारे संत ज्ञानेश्‍वर माऊली व त्यांनी.. जो जेवांछिल…तो ते लाहो.. असा आशीर्वाद सर्वांना देण्याची परमेश्‍वरा कडे केलेली मागणी विश्‍वकल्याणाचा हेतू स्पष्ट करून जाते. त्यामुळे ज्ञानेश्‍वरी उर्फ भावार्थ दीपिकाची पारायणे अनेक ठिकाणी होतात. भक्तीयोग, ज्ञानयोग व कर्मयोगसांगणार्‍या ज्ञानेश्‍वरीच्या 18 अध्यायांतून तब्बल 9 हजारावर ओव्या आहेत. त्या हाताने लिहिण्यासाठी लिखाणाचा सराव व रोज किमान 5-6 तास एकाजागी बैठक करण्याची शारीरिक क्षमता गरजेची होती. त्यामुळे 65 वर्षीय सुलभा भालसिंग यांना हे आव्हान झेपेलका, याची कुटुंबीयांना शंका होती. पण, रोज घरातील स्वयंपाक-पाणी व अन्यकामे सांभाळून दुपारी लिखाण करण्याचे नियोजन त्यांनी केले व 95 दिवसात लिखाणपूर्ण केले. त्यामुळे कुटुंबीयही आश्‍चर्यचकित झाले. अर्थात, त्यावर सुलभाताईंचे हातजोडून म्हणणे एकच व ते म्हणजे…माऊलींनी माझ्याकडून करवून घेतले…

चारशेवर झाली पाने – नेवाशाचे ज्ञानेश्‍वर संस्थान(Dyaneshwar Sansthan) व सोनईच्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठान(Yashwant Social Foundation of Sonai) ने संत ज्ञानेश्‍वरांच्या संजीवन समाधीला 725 वर्षे झाल्याने हाताने ज्ञानेश्‍वरी लेखन करण्याचा उपक्रम राबवला होता. यासाठी 750 वह्या भाविकांना वाटल्या. सुलभा भालसिंग यांना त्यांच्या पुतणी संगीता महामिने(Sangeeta Mahamine) यांनी अशी एक वही दिली. त्यानंतर त्यांनी लाल व काळ्या शाईचे पेन आणले व 19 एप्रिलला अंगारिका चतुर्थीला(Angarika Chaturthi) लिखाण सुरू केले. तब्बल 45 वर्षांनी हाताने लिहीत असल्याने सुरुवातीला वेग कमी होता. रोज 30 ओव्या लिहून व्हायच्या. मात्र, त्यानंतर त्यांच्या लिखाणाने गती पकडली. ज्ञानेश्‍वरीपाहून त्यानुसार लिखाण करता करता त्या रोज दोनशेवर ओव्या लिहू लागल्या व नुकतेच 7 ऑगस्टला नेवाशाला जाऊन ज्या पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्‍वरांनी सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्‍वरी सांगितली, त्या पैस खांबाच्या साक्षीने तेथेच पसायदाना च्या नऊ ओव्या लिहून त्यांनी ज्ञानेश्‍वरी स्वहस्ते लिखाणाचे उद्दिष्ट साध्य केले. 95 दिवसात 403 पानांचे ज्ञानेश्‍वरी लेखन त्यांनी केले आहे.

प्रोत्साहनाने दिला उत्साह – काही उद्योग नाही म्हणून करता वा खूप मस्त उपक्रम आहे, अशा दोन्ही टोकाच्या प्रतिक्रियांमुळे ज्ञानेश्‍वरी स्वतःच्या हाताने लिहिण्याला उत्साह मिळाला. पती सुरेशराव,(Suresh Rao) मुले डॉ. सोनल,(Dr. sonal) डॉ. संदीप(Dr. Sandeep) व अभियंता स्वप्नील(Engineer Swapnil) तसेच सुना डॉ. सीमा,(Dr. sima) डॉ. अमृता(Dr. Amrita) व डॉ. केतकी(Dr.ketki) यांच्यासह बंधू उद्योजक विश्‍वनाथ पोंदे(Vishwanath Ponde) व वैज्ञानिक लेखक डॉ. दत्ता पोंदे(Dr. Dutta Ponde) यांनी लिखाणासाठी प्रोत्साहन दिले. नाती गार्गी व गरीमा आजी किती सुंदर लिहिते म्हणत पाणी व अन्य मदत करायच्या. त्यामुळे लिखाण करणे फारसे अवघड गेले नाही, असे सुलभाताईंनी आवर्जून सांगितले. पसायदान लिहिण्यासाठी पैस खांबाजवळ जाताना स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्‍वरी डोक्यावर घेऊन जेव्हा पैस खांबाभोवती फेरी मारली तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले व तो आनंदक्षण जीवनाचे सार्थक झाल्याची अनुभूती देऊन गेला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले

अनुभवांतून आली प्रचिती– वयोमानानुसार उजव्या हातात चहाचा कप धरला तरी हात थरथरतो. पण याच थरथरत्या उजव्या हाताने जेव्हा ज्ञानेश्‍वरी लिहू लागले, तेव्हा हाताचे थरथरणे जाणवलेच नाही व झालेही नाही. लिहिताना काहीच अडचण आली नाही, असे सांगून सुलभाताई म्हणाल्या, आषाढी एकादशीच्या दिवशी सावेडीतील माऊली सभागृहा जवळील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बसून किमान पाच ओव्या तरी लिहिण्याचा संकल्प केला होता. पण त्यादिवशी खूप पाऊस होता. तरीही संकल्पपूर्ती साठी घराबाहेर पाऊल टाकले आणि चक्क पाऊस थांबला. त्यामुळे तेथे जाऊन लिखाण केलेव घरात पाऊल टाकल्याक्षणी बाहेर पुन्हा धो-धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे हे दोन अनुभव आयुष्यभर स्मरणात राहणारे ठरले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

भावी पिढीत  आध्यात्मिकता रुजावी- सध्याच्या वैज्ञानिक व मोबाईल मय पिढीने मानसिक स्वास्थ्या साठी रोज कोणत्याही आध्यात्मिक पुस्तकातील किमान 8-10 ओळी लिहायला पाहिजे. धार्मिक रुढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा अशा विचारांपेक्षा शारीरिक व मानसिक ताणतणावातून काहीवेळ विश्रांतीच्या हेतूने असे लिखाण केले तरी ते मानसिक समाधान देईल. किंबहुना, शाळांतूनही मुलांकडून असे रोज किमान 5-6 ओळी तरीआध्यात्मिक लिखाण करवून घेतले तरी त्यांच्यात अवांतर लिखाणाची सवय रुजेल व आध्यात्मिक संस्कारही होऊन सक्षम पिढी घडेल, असा विश्‍वास सुलभाताई भालसिंगयांनी यानिमित्ताने आवर्जून व्यक्त केला.

COMMENTS