Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता मेंटर देणार पोषण कार्यक्रमाचे प्रशिक्षण

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाडी केंद्रनिहाय होणार प्रशिक्षण कार्यक्रम

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक व IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हयामध्ये "प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम" राबविण्यात येत आहे. या कार

वडगाव गुप्ता येथे युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने जनसुरक्षा अभियान संपन्न
देशात परिवर्तनाची सुरूवात ः शरद पवार
विहीर, गायगोठा आणि घरकुल योजनेचा लाभ मिळावा ः कैलास राहणे

नाशिक : जिल्हा परिषद नाशिक व IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हयामध्ये “प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यामधून ३०० प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली होती व त्यांना मार्च महिन्यामध्ये जिल्हास्तरावर या कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या ३०० प्रशिक्षणार्थीनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करत होते. त्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रत्येकी १० केसेस दत्तक (Adopt) घेतल्या होत्या व त्यांचा सखोल अभ्यास ते करत होते. सप्टेंबर महिन्यात आयोजित बैठकीमध्ये दत्तक घेतलेल्या माता व बालक यांच्यावरील सकारात्मक परिणाम हे दाखवण्यात आले. या ३०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी अंतिम परीक्षेमधून ६० मेंटर व ३० फॅसिलीटर म्हणून निवड करण्यात आली आहे. या ६० मेंटरची कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थिती आज जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, स्तनपान प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. हर्षलकुमार महाजन हे उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्यापासून प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य व महिला बालविकास विभागातील कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ८३२ आशा व ८५६ अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण हे पूर्ण झाले आहे. दि. २० डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत पुढील टप्प्यातील प्रशिक्षण हे घेतले जाणार असून ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रशिक्षण हे यामाध्यमातून पूर्ण होणार आहे. यासाठीची प्रशिक्षण पूर्व कार्यशाळा आज जिल्हा परिषदेच्या कै. कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आले. या कार्यशाळेत प्रत्येक मेंटरने प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांना शिक्षकाच्या भूमिकेतून प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणार्थीच्या अडचणी समजून घेऊन त्यावर सुयोग्य मार्गदर्शन करत प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबवावा असे यावेळी सांगितले.

COMMENTS