Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता डोक्यावरचे कर्ज कसे फेडणार; अतिक्रमणात व्यवसाय झाला थंडगार

लोणंद / सुशिल गायकवाड : हातात असलेली शंभरची नोट आणि काही दहाच्या नोटा दाखवत आता एवढेच पैसे उरलेले आहेत. आता जगायचे कसे असा प्रश्‍न अतिक्रमणात व्य

वाचकांकडून वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान
कराड-पाटण मार्गावर स्कॉपिओ-टेम्पो धडक; स्कॉपिओ चालक गंभीर
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके

लोणंद / सुशिल गायकवाड : हातात असलेली शंभरची नोट आणि काही दहाच्या नोटा दाखवत आता एवढेच पैसे उरलेले आहेत. आता जगायचे कसे असा प्रश्‍न अतिक्रमणात व्यवसायाला कुलूप लागलेल्या व्यवसायिक महिलेने उपस्थित केला आहे. आधीच कोरोनाने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडलेले असून आज अतिक्रमण काढल्यामुळे पुन्हा एकदा लोकांना जगणं मुश्किल झालेले आहे. आज लोणंद, ता. खंडाळा येथे जी अतिक्रमण मोहिम राबविली गेली. त्यात अनेकांच्या जगण्याचा प्रश्‍न पुढे आला आहे. कारवाई झाल्यापासून सलग दोन दिवस व्यवसायच करता न आल्याने आता कुटूंबासाठी लागणारा घर खर्च आता थांबणार आहे का? हा घर खर्च आणायचा कुठून? अशी खंत व्यक्त केली जात आहे.
मुलांचे शिक्षण, बँकांचे घेतलेले कर्ज, आता भांडवलासाठी नसलेले पैसे, व्यवसाय कुठे आणि कसा करायचा, संसाराचा गाडा कसा हाकायचा अशी गंभीर परिस्थिती सद्यस्थितीत अनेक व्यवसायिकांवर उद्भवली आहे. जगण्याच्या वारीत आता वाट सापडेना झाली आहे. अशी व्यथा सर्वसामान्य व्यवसायिकांची झाली आहे. नातेवाईक फोन करून धीर देण्याचा ही प्रयत्न करू लागले आहेत. ऐन पावसाळ्यात व्यवसायाचे छतच नाहीसे झाल्याने आता व्यवसाय करताना नव्या छताला कुठे निर्माण करायचे हा प्रश्‍न या लोकांपुढे आहे.
पालखी सोहळा हा आनंदाचा सोहळा असताना यंदा आलेल्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. व्यवसायाच पूर्णपणे थंड पडलेला असून दररोज मिळणारी हातची कमाई आता बंद झाली आहे. कोरोना काळात व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. तेंव्हा लोकांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागले होते. याची कल्पना तर सर्वांनाच आहे. अतिक्रमण कारवाईने व्यवसायास ब्रेक लागणार नाही असेल तर अशा कारवाईने जागा तर मोकळ्या केल्याच पण अनेकांच्या संसाराला धुळीस मिळवुन आणले आहे. अतिक्रमणामुळे एक दिवस जरी एखादे कुटूंब अडचणीत आले असले तरी हे खूप मोठे पाप केल्या सारखेच आहे. या व्यवसाय करणार्‍या लोकांना त्यांच्या व्यवसायावर जी कारवाई केली आहे. त्या लोकांना तात्काळ ज्या पध्दतीने ते व्यवसाय करत होते अशी जागा उपलब्ध करुन तर दिली पाहिजे. शिवाय जे-जे नुकसान झाले ती भरपाई त्यांना द्यायला हवी.

COMMENTS