मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजनला बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राजनला जामीन मंजूर केला आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक
मुंबई : कुख्यात गुंड छोटा राजनला बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राजनला जामीन मंजूर केला आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. 30 मे 2024 रोजी विशेष मोक्का न्यायालयाने राजनसह इतरांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी राजनची शिक्षा रद्द करावी तसेच त्याला जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. बुधवारी न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जातमुचलका भरण्याचे आदेश देत छोटा राजनची जन्मठेपेची शिक्षा रद्द करत त्याला जामीन मंजूर केला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजनच्या जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केली आणि त्याला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने छोटा राजनला जामिनासाठी एक लाख रुपयांचा मुचलका भरण्याचे आदेश दिले.
COMMENTS