कावड यात्रेवर हल्ल्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कावड यात्रेवर हल्ल्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : श्रावण महिन्यात निघणार्‍या कावड यात्रेदरम्यान कट्टरवाद्यांकडून हल्ल्याचा धोका असल्याची गोपनिय माहिती पुढे आलीय. यापार्श्‍वभूमीवर केंद्री

डॉ.साबळेंच्या निलंबनाने जिल्हा पेटला;लोकप्रतिनिधी गप्प का-एस.एम.युसूफ़
प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन
शेतकर्‍यांनी शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक उन्नती साधावी

नवी दिल्ली : श्रावण महिन्यात निघणार्‍या कावड यात्रेदरम्यान कट्टरवाद्यांकडून हल्ल्याचा धोका असल्याची गोपनिय माहिती पुढे आलीय. यापार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. दरम्यान केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने रेल्वेवरील धोक्याचा इशाराही दिलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, यंदा कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीय घटकांपासून होणार्‍या संभाव्य धोक्याबाबत सर्वाधिक सतर्क रहावे लागेल. केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं ही सूचना जारी केलीय. यासंदर्भात माहिती मिळताच राज्यांनी त्यांच्या पोलिसांना आणि स्थानिक माहिती यंत्रणेलाही सतर्क केलेय. सतर्क राहण्यासोबतच केंद्रीय गृह मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अतिरिक्त निमलष्करी सुरक्षा दल तैनात करण्याचा सल्ला दिलाय. हे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी असेल. गृह मंत्रालयाने ही मार्गदर्शक सूचना सर्व राज्यांना पाठवलीय. मात्र, ज्या राज्यांमध्ये कावड यात्रेची प्रथा अधिक आहे, त्या राज्यांना विशेष खबरदारी देण्यात आलीय.

COMMENTS