Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संपकरी बेस्ट कर्मचार्‍यांना कंपनीकडून नोटीस

मुंबइ : मुंबईत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. सोमवारी संपाचा सहावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मुंबईच्या आझाद

स्वामी सर्वांचे रक्षणकर्ते… स्वामींची कृपा सर्वांवर होवो… श्री स्वामी समर्थ… (Video)
मध्यान्न भोजनातून 16 मुलांना विषबाधा
भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

मुंबइ : मुंबईत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत. सोमवारी संपाचा सहावा दिवस आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. संपावर गेलेल्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांना कंपन्यांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ’तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.
बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संपानंतर आता बेस्टला कर्मचारी पुरवठा करणार्‍या एसएमटी एटीपीएल असोसिएट कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना नोटीस बजावली आहे. आपण केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासन आणि कंपनीची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे तात्काळ नोकरीवर रुजू व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी गेल्या 6 दिवसांपासून संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. सरकारला मागण्यांबाबत अनेकदा पत्रव्यवहार केल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे. मुंबईकरांना होणार्‍या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहत आहेत असे सांगितले आहे. बेस्टच्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 796 बस गाडया रस्त्यावर धावल्या नाहीत. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टच्या एकूण 122 बस गाडया बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असणार आहेत. बस पुरवठादार व्यवसाय संस्थेविरुद्ध कंत्राटीच्या अटी आणि शर्तीप्रमाणे कारवाई करण्याचे आणि कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले की, ’सरकारने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा. कोणीही मुंबईकरांना वेठीस धरू शकत नाही. अनेक बस गाड्या आज रस्त्यावर नाहीत. याचा त्रास मुंबईकरांना होत आहे.’ सरकारने या संपावर ताबडतोब तोडगा काढवा अशी मागणी त्यांनी केली आहे.

COMMENTS