Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते तथा दिग्ददर्शक विवेक वाघ यांचे बुधवारी निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. अभिनेते मिलिंद शिंत्रे यां

भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात, 9 जवान शहीद 1 जखमी
शिवशाही बसच्या अपघातात 14 प्रवाशी जखमी
वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची गोळ्या झाडून आत्महत्या ; वरिष्ठांविरोधात आरोप

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते तथा दिग्ददर्शक विवेक वाघ यांचे बुधवारी निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. अभिनेते मिलिंद शिंत्रे यांनी एका पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम निर्माते दिग्दर्शक विवेक वाघ यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले. त्यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता, असे असे मिलिंद शिंत्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विवेक वाघ यांनी ‘सिद्धांत’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘शाळा’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘फँड्री’ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. ‘कातळशिल्प’ या विषयावरही त्यांनी माहितीपट साकारला होता.

COMMENTS