Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवनात कितीही संकटे आली तरी, श्रद्धा कायम ठेवा ः श्री भास्करगिरीजी महाराज

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या  कीर्तन मह

आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा : फरताळे
शेवटी महिलाच उतरल्या राखेसाठी रस्त्यावर l पहा LokNews24
विखे पिता-पुत्राला धडा शिकविणार

नेवासाफाटा/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील मुकींदपूर रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या  कीर्तन महोत्सवात गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या सोमवारी दि.27 मार्च रोजी झालेल्या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जीवनात कितीही वावटळे आले तरी श्रद्धेशी बळकट रहाण्याचा प्रयत्न करा हे करतांना देशाभिमान, धर्माभिमान बाळगून माणुसकीच्या स्वाभिमानाला जपण्याचा प्रयत्न करा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी बोलतांना हभप श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की येथे श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शूरवीर मावळे यांची चरित्र कथा सुरू आहे शक्ती व भक्ती चे हे प्रतीक आहे, शक्ती व भक्तीचा संगम येथील कार्यक्रमामुळे झाला आहे. महंत सुनीलगिरी महाराजांनी यासाठी चांगले नियोजन केले आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तीची मिठाई येथे मिळत आहे. देश अबाधित आहे म्हणून येथे धार्मिक कार्यक्रम आपल्याला वैभवात करता येतात. संस्कार व संस्कृतीने देशाला खरी बळकटी आली असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म व समाजकार्य करणार्‍यांनी पोट मोठं करायला शिकल पाहिजे, धर्माचे पालन करतांना पाखंडी लोकांचे खंडन ही आम्हाला करायचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे म्हणून देशाभिमान स्वाभिमान बाळगून देवदेवता व संतांचा सन्मान कायम ठेवा हे सांगतांनाच त्यांनी रामकृष्ण हे आपले राष्ट्रीय दैवत असून मोठ्या बलिदानाने व कष्टाने अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक राम मंदिर हे आपल्यासाठी अयोध्या असल्याचे सांगत त्यांनी जीवनात कितीही वावटळे येऊ द्या, मात्र श्रद्धेशी बळकट रहाण्याचा प्रयत्न करा. बंधनातून सुटायचे असेल तर राम चिंतन करा असे, आवाहन गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले. यावेळी महंत सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांचा वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला तर सोमनाथ गव्हाणे यांच्या हस्ते गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे संतपूजन करण्यात आले. श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत श्री सुनीलगिरीजी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, शिवचरित्र कथाकार हभप प्रदीप महाराज नलावडे, साध्वी सुवर्णांनंद चैतन्य, वात्सल्यमूर्ती रामनाथ महाराज पवार, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, हभप मुंगसे, बाळकृष्ण महाराज कानडे, अंजाबापू कर्डीले, ज्ञानेश्‍वर महाराज हजारे, मृदुंगाचार्य भरत महाराज पठाडे, कैलास महाराज, संकेत स्वामी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी अन्नदान व कथा सोहळयासाठी योगदान देणार्‍या भाविकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. अशोक गाडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कीर्तन महोत्सवाच्या कीर्तन प्रसंगी आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करत रथातून मिरवणूक काढून गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी निघालेल्या मिरवणूकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS