चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केलेले नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्ह्यात घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केलेले नाही : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : ए.सी.सी. सिमेंट कंपनीने स्वामीत्वधन न भरता कोणतेही जादा उत्खनन केलेले नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले. चंद्रपू

चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांमुळे सातारा शहरातील टँकरवाल्यांची दिवाळी सुरु
लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 गुणवंत शिक्षकांचा सन्मान

मुंबई : ए.सी.सी. सिमेंट कंपनीने स्वामीत्वधन न भरता कोणतेही जादा उत्खनन केलेले नसल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे ए.सी.सी.सिमेंट कंपनीने जादा उत्खनन केल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, सुरेश वरपुडकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.देसाई म्हणाले की, खनिकर्म संचालकांमार्फत दर तीन महिन्यांनी खाणींची पाहणी केली जाते. 1969 पासून ए.सी.सी. कंपनी सिमेंट उत्पादन क्षेत्रात काम करीत असून या कंपनीने जादा उत्खनन केल्याचे आढळून आलेले नाही. प्रमुख खनिजांचे वहन नियंत्रित करण्याकरिता आयएलएमएस (ILMS) या संगणकीकृत प्रणालीचा वापर होतो. वाहतूक करणारे नोंदणीकृत वाहन वजनकाट्यावर उभे राहताच या प्रणालीमार्फत खनिजाच्या वजनानुसार ऑनलाईन वाहतूक परवाना प्रत्येकवेळी दिला जातो. त्याचवेळी वजनानुसार प्रणालीमधून स्वामीत्वधनाची कपात केली जाते. मंजूर आराखड्यानुसार 2020-21 मध्ये 6.02 लाख टन इतके उत्खननास मंजूरी असून प्रत्यक्षात खाणपट्टेधारकाने 4.41 लाख टनाचे उत्खनन केले आहे. यातूच स्वामीत्वधनाची 3.53 कोटी रुपये रक्कम जमा केलेली आहे. त्यामुळे मंजूर उत्खननापेक्षा कमी उत्खनन झालेले असल्याने जादा उत्खनन झाल्याची बाब खरी नाही. तरीही कंपनीबाबत काही आक्षेप असल्यास याबाबत दखल घेतली जाईल.

COMMENTS