मुंबई ः मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असून, सर्वेक्षणाची मुदत शुक्रवारी रात्री संपत आहे. 31 जानेवारी
मुंबई ः मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली असून, सर्वेक्षणाची मुदत शुक्रवारी रात्री संपत आहे. 31 जानेवारीपर्यंत राज्य सरकारने सर्वेक्षणाची मुदत दिली होती, मात्र त्यानंतर दोन दिवस पुन्हा वाढवून 2 फेबु्रवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत संपत असून, सर्वेक्षणास पुन्हा मुदतवाढ देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.
राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2 कोटी 12 लाखांहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झाला आहे. या सर्वेक्षणाचा शुक्रवार अखेरचा दिवस असून या सर्वेक्षणाचा अहवाल शनिवारी सुपूर्द करणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठकही पार पडली. या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करुन शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही शासनाकडून करण्यात आल्या आहेत. मुदतवाढ मिळाली नसल्यामुळं आता मराठा समाज संघटनांकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
COMMENTS