मुंबई : नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेकांनी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, हॉटेलमध्ये गर्दी केली. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्

मुंबई : नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेकांनी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, हॉटेलमध्ये गर्दी केली. त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी मुंबई शहर आणि उपनगरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुमारे 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तर, काही ठिकाणी वाहने लावण्यास मनाई केली होती. मात्र, तरीही नववर्षांच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 8 हजार 678 प्रकरणांची नोंद झाली आहे.
यामध्ये 156 प्रकरणे ही मद्यपी चालकांची आहेत. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी आणि नववर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांपैकी अनेकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. वेगवान वाहन चालवणे, विना हेल्मेट, मद्यपान करून वाहन चालवणार्यांवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदीच्या ठिकाणी विशेष पोलीस पथकांकडून वाहन चालकांची तपासणी करण्यात येत होती. त्यात आढळलेल्या 156 मद्यपींवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. अतिवेगात वाहने चालविणार्या 66 जणांवर कारवाई करण्यात आली.
COMMENTS