अहमदाबाद : नवसारीमध्ये कार आणि बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 32 जण जखमीही झाले आहेत. त्यातील 17 जणांची प्र
अहमदाबाद : नवसारीमध्ये कार आणि बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 32 जण जखमीही झाले आहेत. त्यातील 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
नवसारी जिल्हा पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या 11 जणांना नवसारी येथील जवळच्या रुग्णालयात, तर अन्य 17 जणांवर वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला सूरतच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर बस चालकाला मोठा धक्का बसला आणि त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फॉर्च्युनर कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणार्या बसला धडकली.प्राथमिक माहितीनुसार, बस अहमदाबाद शताब्दी महोत्सवासाठी प्रवाशांना घेऊन वलसाड येथे जात होती. दरम्यान रेश्मा गावाजळ एका फॉर्च्युनर कार आणि बसची धडक झाली. या अपघातानंतर रोडवर वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या.
COMMENTS