Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे डाव्या कालव्याला दोन दिवसात पाणी सोडणार ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे मतदार संघातील इतर गावांबरोबरच कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या वरच्या भागाती

भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात
घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी झाली बालाजीरायांची व हनुमंतरायाची भेट….
प्रा. अशोक लोळगे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

कोपरगाव ः कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही त्यामुळे मतदार संघातील इतर गावांबरोबरच कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या वरच्या भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी,मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादाराबाद, तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या जिरायती गावात पाणी टंचाई जाणवत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या गावांसाठी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी तातडीने सोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या होत्या. त्या सुचनेनुसार दोन दिवसात निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नगर नाशिकच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्यामुळे धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा असून त्यास निळवंडे धरण देखील अपवाद नाही. याउलट लाभक्षेत्रामध्ये उलट परिस्थिती आहे. त्यामुळे मतदार संघातील दुष्काळी गावांना जलसंपदा विभागाने निळवंडे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे याबाबत आ.आशुतोष काळे यांची सकारात्मक चर्चा झाली होती. जलसंपदा विभागाने नुकतेच निळवंडेच्या उजव्या कालव्याला शेतीसाठी आवर्तन सोडले आहे. व लवकरच डाव्या कालव्याला देखील आवर्तन सोडणार आहे. मागील वेळी निळवंडे कालव्याला पाणी सोडण्यात आले असता आ. आशुतोष काळे यांनी स्वत: लक्ष देवून लाभक्षेत्रातील सर्व गावातील पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेतल्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नाही. कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नाही थोड्या फार पावसावर खरीप पिके तग धरून उभी आहेत. कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या वरच्या भागातील गावांचे पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य नाही.त्यामुळे या आवर्तनातून पिकांना जीवदान मिळेल व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न देखील मार्गी लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी निळवंडेच्या डाव्या कालव्यातून टेल टू हेड सर्व पाझर तलाव, साठवण तलाव, ओढे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळे वरच्या भागातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी,मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादाराबाद, तसेच मतदार संघातील राहाता, चितळी, धनगरवाडी, वाकडी या गावातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

COMMENTS