पुणे : महाराष्ट्र राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्य

पुणे : महाराष्ट्र राज्यात पुढच्या आठवड्याभरात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला.
राज्यातही थंडीची चाहूल कमी होत असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बर्याच तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बर्याच ठिकाणी तर मराठवाड्यातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली.
सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरीत 35.7 अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान महाबळेश्वर येथे 18.2 अंश सेल्सिअस इतके नोंदविले. राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच विभागात थंडी कमी झाली आहे.
सध्या अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र त्याचबरोबर राज्यात प्रवेश करणारे बाष्पयुक्त वारे यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे 19 नोव्हेंबरपर्यंत दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.
COMMENTS