Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे कसोटीत न्यूझीलंड 259 धावांवर सर्वबाद

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना गुरूवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझी

महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
सुवर्णपदकाविनाच संपली भारताची मोहीम
खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते : राजेंद्र पवार

पुणे : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना गुरूवारपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडला 259 धावांवर सर्वबाद केले. नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. किवी संघाने एकवेळ बिनबाद 32 धावा केल्या होत्या. पण यानंतर आर अश्‍विनने या धावसंख्येवर भारताला पहिले यश मिळाले. त्याने त्याच्या पहिल्या षटकात किवी कर्णधार टॉम लॅथमला (15) पायचीत केले. यानंतर न्यूझीलंडला दुसरा धक्का विल यंगच्या (18) रूपाने पडला. जो अश्‍विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पंतच्या हाती झेलबाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे (76) यांनी स्कोअरकार्ड 138 पर्यंत नेला. रचिन आणि कॉनवे सेटल झाल्याचंही वाटत होतं, पण अश्‍विन पुन्हा एकदा भारतासाठी ट्रबलशूटर ठरला आणि भारताची तिसरी विकेट मिळवली. बेंगळुरूमधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला रचिन रवींद्र पुण्यातही फॉर्मात दिसला, तो शतक करेल असे वाटत होते, पण तो वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत अडकला आणि 65 धावा करून क्लीन बोल्ड झाला. सुंदरने टीम साऊदी (5), एजाज पटेल (4) आणि मिचेल सँटनर (33) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने 59 धावांत 7 गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्‍विनने 3 विकेट घेतल्या.

COMMENTS