कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यात नवे निर्बंध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्यात नवे निर्बंध

संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच सार्वजनिक प्रवासाची मुभा; नव्या ओमीक्रॉन विषाणूने जगाला पुन्हा धडकी

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतांना, नव्या व्हेरिएंटने डोके वर काढल्यामुळे जगभरात चिंतचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या क

राज्य सरकारकडून लॉजिस्टिक धोरणाला मंजूरी
लाडकी बहीण आणि राज्याचा खिसा !
गुणरत्न सदावर्तेंना दिलासा

नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतांना, नव्या व्हेरिएंटने डोके वर काढल्यामुळे जगभरात चिंतचे वातावरण आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या कोरोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. राज्य राज्य सरकारने अनेक कोराना प्रतिबंधात्मक नियमांमध्यये शिथिलत दिली आहे. दरम्यान, ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेले आहे अशाच व्यक्तींना यापुढे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीत हा आदेश देण्यात आला आहे.
नव्या नियमावलीनुसार, राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र नियम पाळले जात नसतील तर संबंधित आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग मोठया प्रमाणावर ओसरला असून, विविध देशांत निर्बंध शिथील केल्यानंतर आता पुन्हा एकदा आफ्रिकेत ओमीक्रॉन विषाणू आढळून आला आहे. त्याला गेल्या काही दिवसात न्यू नावाने ओळखले गेले. पण जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रॉन असे नाव दिलेले आहे. कोरोनाचा हा नवा अवतार दुसर्‍या लाटेतल्या डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अजून तरी आपल्याकडे ओमीक्रॉनची लागण झालेला एकही रुग्ण मिळालेला नाही. पण तो सापडणारच नाही असे सांगता येत नाही. त्यामुळेच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना अलर्ट रहायला सांगण्यात आले. विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तर सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. ओमीक्रॉन हा कोरोनाचाच नवा प्रकार आहे आणि तो डेल्टापेक्षा जास्त घातक आहे. विशेष म्हणजे तो सतत बदलत रहातो. चालू महिन्यात आफ्रिकेतल्या बोत्सवाना देशात तो पहिल्यांदा सापडला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, मोझंबिक, इस्टोनियासह सहा देशात त्याची लागण झालेले रुग्ण मिळाले. गेल्या आठवड्याभरात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही अडीच हजारापेक्षा जास्त झाली. हा विषाणू वेगानं फैलावतो आणि त्याचा संसर्गही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनात आले. विशेष म्हणजे लस घेतलेली असेल तरीसुद्धा ओमीक्रॉनचा संसर्ग होत असल्याचं अभ्यासात स्पष्ट झालंय. त्यामुळेच दुसर्‍या लाटेत मृत्यूचे तांडव करणार्‍या डेल्टापेक्षाही ओमीक्रॉनचा धोका अधिक आहे. आफ्रिकेत नव्या कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर इंग्लंड, इस्त्रायलने सहा आफ्रिकन देशातून येणार्‍या विमानांवर बंदी घातली. ज्यात दक्षिण आफ्रिका, नामीबिया, झिम्बाब्वे, लिसोथो, एसवानिटी देशांचा समावेश आहे. पोर्तुगालमध्ये जिथं जगातलं सर्वाधिक लसीकरण झाले. तिथेही रुग्ण जास्त सापडल्यामुळे आणीबाणी घोषीत केलीय. निर्बंध लादलेत. झेक रिपब्लिकमध्ये लॉकडाऊनची स्थिती येताना दिसतेय. जर्मनी, फ्रान्स, अमेरीकेतही नव्या रुग्णांचा आकडा लाखात जातोय. त्यामुळेच नव्या कोरोनाने जगाला पुन्हा एकदा धडकी भरली.

राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेे नियम

  • एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करायचा असल्यास दोन डोस अनिवार्य
  • रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्क वापरला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये दंड
  • दुकानात ग्राहकांने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड
  • मॉल्समध्ये ग्राहकांने मास्क घातला नसेल तर मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड
  • राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी, मात्र नियम पाळले जात नसतील तर आयोजकांवर 50 हजार दंड.

ओमीक्रॉन डेल्टापेक्षा 7 पट वेगाने पसरण्याचा अंदाज
ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे वैज्ञानिकांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे. कारण हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा 7 पट वेगाने पसरण्याचा अंदाज आहे. लोकांमध्ये संक्रमित करण्याचा धोका डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमीक्रॉन व्हेरिएंटमध्ये जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हेरिएंटची ओळख पटल्यापासून आतापर्यंत त्याचे 32 म्यूटेट झाले आहेत. भारतात सध्या या व्हेरिएंटचा कुठलाही रुग्ण आढळला नाही. परंतु परदेशातून येणार्‍या प्रवाशांची कठोर तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत.

COMMENTS