नवी दिल्ली : प्राप्तिकराचे नियम अतिशय सोपे आणि सुलभ होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी लोकसभेत नवे प्राप्तिकर विधेयक

नवी दिल्ली : प्राप्तिकराचे नियम अतिशय सोपे आणि सुलभ होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी लोकसभेत नवे प्राप्तिकर विधेयक सादर केले. सदर विधेयक लोकसभेत सादर करताच संसदेत गदारोळ झाला. सदर विधेयक संमत झाल्यानंतर ते प्राप्तिकर कायदा 1961 ची जागा घेईल. या विधेयकात 536 कलमे असून, या विधेयकामुळे प्राप्तिकराची प्रक्रिया सोपी होणार आहे.
या नव्या विधेयकात प्राप्तीकरासंदर्भातील जटील शब्द आणि अनावश्यक तरतूदी काढून टाकण्यात आल्या असून त्याऐवजी संक्षिप्त वाक्यांचा वापर करून प्राप्तीकर नियमांची भाषा सुलभ करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्राप्तीकरासंदर्भातील नियम त्यातील कलमे समजण्यास सोपे जाणार आहे. यामध्ये ‘टॅक्स इअर’ नावाची नवीन संज्ञा वापरली आहे. अगोदर ‘प्रीवियस इअर’ आणि ‘असेसमेंट इअर’ सारख्या गुंतागुंतीच्या संज्ञा काढून टाकल्या आहेत. नवीन प्राप्तीकर विधेयक 622 पानांचे असून त्यात 536 कलमे, 23 प्रकरणे आणि 16 अनुसूचींचा समावेश आहे. या विधेयकात कोणतेही नवीन कर नाहीत. तर 1961 च्या विद्यमान आयकर कायद्याच्या (298 कलमे आणि 14 अनुसूची) भाषेचे सुलभीकरण केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी नवे प्राप्तिकर विधेयक मांडताच लोकसभेत विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. काही विरोधकांनी हे विधेयक सादर होण्याआधीच सभागृहाचा त्याग केला.
COMMENTS