Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधानातील तत्व आचरणात आणण्याची गरज : स्वाधीन गाडेकर

राहाता प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. या लोकशाहीचा पवित्र ग्रंथ संविधान असून संविधानातील तत्व आचरणात आणून लो

संगमनेरातील प्रसिद्ध नसीब वडापाव दुकान प्रशासनाकडून सील
सरकारी मदत मिळण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचे तहसीलदारांना निवेदन
नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा

राहाता प्रतिनिधी : जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. या लोकशाहीचा पवित्र ग्रंथ संविधान असून संविधानातील तत्व आचरणात आणून लोकशाहीचा सन्मान अधिक जपणे व वाढविणे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य असून प्रत्येकाने ते कर्तव्य जपले पाहिजे असे प्रतिपादन डॉ के वाय गाडेकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर यांनी केले.
राहाता शहरातील डॉ के वाय गाडेकर माध्यमिक विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन तथा शिक्षण संस्थेचे विश्‍वस्त डॉ स्वाधीन गाडेकर होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संतोष माळवदे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप शिरसाठ,सौ सुनिता रहाणे,विजय त्रिभुवन,अविनाश हजारे, वैभव कुलकर्णी, सुनील पवार,अशोक वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर म्हणाले की जगात सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या आपल्या देशात संविधानाने स्वातंत्र्य समता बंधुत्वता न्याय यासह अनेक हक्क व अधिकार आपणास दिले आहेत ते आपणा सर्वांसाठी खूप अनमोल आहेत संविधाना बरोबरच निसर्गातील प्रत्येक बाबी करिता कायदे व अधिकार दिले आहेत संविधान लोकशाहीचा पवित्र ग्रंथ आहे या संविधानातील तत्त्वानुसार आचरण करणे स्वतःचे व राष्ट्राचे हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे संविधान म्हणजे आपली आचारसंहिता आहे त्यामधील तत्व व आचारातून आपल्याला शिक्षण मिळते हे शिक्षण आपल्या जीवनाचा भरभक्कम पाया आहे. संविधानातील तत्त्वांचे वाचन व आचरण करणे प्रत्येकासाठी गरजेचं आहेच तसेच भावी पिढीच्या विकास व उत्कर्षासाठी महत्वपूर्ण आहे. आपल्या संविधानाचा जगात मोठा नावलौकिक आहे. त्यामुळे जगात आपल्या लोकशाहीला मानाचे मोठे स्थान असल्याचे यावेळी डॉ स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

COMMENTS