Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी-शिवसेनेत पहिल्याच बैठकीत खटके

शिंदे गटाच्या आमदारांची उघड नाराजी व्यक्त

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. मात्र ज्या अजित पवारांवर आणि राष

कुकडीचे पाणी व अवकाळीने नुकसानीच्या मदतीसाठी आज काँगे्रसचे आंदोलन
नेपाळमध्ये 4.5 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
राजस्थानमधील जोधपूर मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. मात्र ज्या अजित पवारांवर आणि राष्ट्रवादी काँगे्रसवर शिंदे गट टीका करत होते, त्याच गटासोबत आता शिंदे गटाला सोबत बसावे लागत आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे आणि ठाकरे गटामध्ये खटके उडाल्याचे पाहायाला मिळाले.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा असतांना, राष्ट्रवादी काँगे्रसला सत्तेत सहभागी करून घेण्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करून त्यांच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिल्याने आपली वर्णी कधी लागेल, असा प्रश्‍न शिंदे गटाच्या आमदारांकडून उपस्थित होत आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला महत्वाची खाती येण्याची शक्यता कमीच आहे. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आता शिंदे गटाने आमदार, मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करु लागले आहे. भाजप-शिवसेना-अजित पवार गट युती सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे व राष्ट्रवादीत खटके उडाले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत मोठा वाटा मिळणार हे स्पष्ट होत असताना शिंदे गटाकडून याला विरोध होताना दिसत आहे. पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांना स्वीकारणार नाही, अशी भूमिका रायगडच्या कर्जतमधील आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली याचं स्वागत आहे. भाजप-शिवसेनेच्या विचारांसोबत सहमत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली किंवा दुसरं कुणीही आलं तरी सत्तेचे विकेंद्रीकरण होते. त्यामुळे सगळे सोडायचे असेल तर सत्ता कशासाठी? असे म्हणत संजय शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले की, नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. थोडी नाराजी राहणारच. कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला आर्धीच मिळाली. ज्याला आर्धी खायची त्याला पाव मिळाली. तरीही आम्ही खूश आहोत. येत्या 8 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आता तरी मंत्रिमंडळात दिसायला पाहिजे. मी पहिल्या लिस्टमध्ये होतो, आता होईल, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

COMMENTS